शिवसेनेला दणका, आमदार महेंद्र दळवी यांना दोन वर्षांची शिक्षा
राज्यात भाजप विरुध्द महाविकास आघाडी संघर्ष रंगला आहे. त्यातच एकमेकांना तुरूंगात टाकण्याची भाषा केली जात आहे. त्यापार्श्वभुमीवर शिवसेनेला अलिबाग सत्र न्यायालयाने मोठा दणका दिला आहे.
X
राज्यात शिवसेना विरुध्द भाजप संघर्ष तीव्र झाला आहे. त्यातच अलिबाग न्यायालयाने आमदार महेंद्र दळवी यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. त्यामुळे हा शिवसेनेसाठी मोठा दणका मानला जात आहे.
आमदार महेंद्र दळवी यांच्याविरोधात 2014 साली एट्रॉसिटी आणि जबरी मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या प्रकरणात अलिबाग सत्र न्यायालयाने आमदार महेंद्र दळवी यांना दोन वर्षांची शिक्षा ठोठावली आहे.
2014 साली अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांच्याविरोधात जबरी मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात एकूण नऊ आरोपींचा समावेश होता. या प्रकरणाची अलिबात सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली. यामध्ये शिवसेना आमदार महेंद्र दळवी यांना दोन वर्षांची शिक्षा आणि दंड ठोठावण्यात आला आहे.
या प्रकरणात आमदार महेंद्र दळवी यांच्यासह नऊ जणांविरोधात दाखल करण्यात आलेला एट्रॉसिटीचा गुन्हा सिध्द न झाल्याने या गुन्ह्यातून सर्व आरोपींची न्यायालयाने मुक्तता केली. मात्र भारतीय दंड विधान कलम 324, 143, 147, 148, 504 आणि आणि पोलिस कायदा 135 अन्वये महेंद्र दळवी यांच्यासह अविनाश म्हात्रे, अंकुश पाटील, अनिल पाटील यांना मुख्य जिल्हा व सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश विभा इंगळे यांनी दोषी ठरवले. तर इतर आरोपींची मुक्तता केली. दरम्यान अलिबाग न्यायालयाच्या निकालानंतर अपील दाखल होईपर्यंत शिक्षेला स्थगीती देण्याची मागणी न्यायालयाने मान्य केली. मात्र शिवसेना आमदार महेंद्र दळवी यांना दोन वर्षांची शिक्षा ठोठावल्याने हा शिवसेनेला मोठा दणका मानला जात आहे.