Home > Max Political > नगरपंचायत निवडणुकीत एकनाथ खडसे यांना धक्का, शिवसेनेचा धोबीपछाड

नगरपंचायत निवडणुकीत एकनाथ खडसे यांना धक्का, शिवसेनेचा धोबीपछाड

नगरपंचायत निवडणुकीत एकनाथ खडसे यांना धक्का, शिवसेनेचा धोबीपछाड
X

राज्याचे लक्ष लागून असलेल्या नगर पंचायत निवडणुकीत एकनाथ खडसे यांना धक्का बसला आहे. जळगाव जिल्ह्यातील बोदवड हा एकनाथ खडसेंचा बालेकिल्ला मनाला जातो, मात्र नगरपंचायत निवडणुकीत शिवसेनेचे नवखे आमदार चंद्रकांत पाटील यांनी एकनाथ खडसेंना धोबीपछाड दिला आहे. बोडबद नगरपंचायतीमध्ये शिवसेनेने 17 जागांपैकी 09 जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवलं आहे. बोदवड मधील पराभव एकनाथ खडसेंना जबर धक्का मनाला जातो आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर एकनाथ खडसेंसाठी ही पहिलीच निवडणूक होती आणि ह्या निवडणुकीत खडसेंचा पराभव झाल्याने जिल्ह्यात नवीन राजकीय समीकरण तयार होतील, असा अंदाज राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केला आहे.

भाजप सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर एकनाथ खडसेंसाठी बोदवडची निवडणूक महत्वाची मनाली जात होती. राष्ट्रवादी पक्षात आपली ताकद दाखवण्याची संधी खडसेंकडे होती. मात्र शिवसेनेचे स्थानिक आमदार चंद्रकांत पाटील यांनी खडसेंना जोरदार आव्हान देत खडसेंच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेने जोरदार मुसंडी मारली आहे. निवडणुकीदरम्यानच खडसेंच्या कन्या रोहिणी खडसे यांच्या कारवर हल्ला झाला होता. हा हल्ला शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी केल्याचा आरोप खडसें परिवाराने केला होता. शिवसेना पदाधिकाऱ्यांवर पोलिसांत गुन्हाही दाखल करण्यात आला होता. त्यानंतर जिल्ह्याचे राजकारणही चांगलेच तापले होते.

बोदवडच्या निवडणूक प्रचारावेळी राष्ट्रवादीचे एकनाथ खडसे, शिवसेनेचे नेते आणि पालकमंत्री गुलाबराव पाटील भाजपचे गिरीश महाजन त्यांच्यात चांगलच वाकयुद्ध रंगलं होतं. बोदवडमध्ये आता शिवसेनेची सत्ता आहे. बोदवड नगरपंचायतच्या 17 जागांपैकी शिवसेनेने सर्वाधिक नऊ जागांवर विजय मिळवत स्पष्ट बहुमत मिळवलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला सात जागा तर भाजपला फक्त एका जागेवर समाधान मानावे लागलं आहे. बोदवड मधील पराभव एकनाथ खडसेंना किंबहुना राष्ट्रवादी काँग्रेसला आत्मचिंतन करावा लागणारा आहे.

बोदवड नगरपंचायत

शिवसेना - 09

राष्ट्रवादी - 07

भाजप - 01

काँग्रेस - 00

Updated : 19 Jan 2022 3:34 PM IST
Next Story
Share it
Top