पंजाबमध्ये शिवसेनेचा राडा, नक्की काय घडतंय पंजाबमध्ये
X
पंजाबमध्ये पटियाला येथे आज झालेल्या सांप्रदायीक दंगलीमुळे तणाव निर्माण झाला आहे. हिंदू आणि शीख संघटनांच्या लोकांमध्ये झालेल्या वादांमुळे पोलिसांना गोळीबार करावा लागला आहे.
राज्याचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी ही घटना दुर्दैवी असल्याचे म्हटलं असून या प्रकरणाशी आपलं डीजीपीशी बोलणं झालं असून दोषींवर कारवाई करण्यात येईल अशी प्रतिक्रिया मान यांनी दिली आहे.
सध्या पटियालामध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पटियाला मध्ये शिवसेनेने (बाळासाहेब ठाकरे समर्थक गट) पटियाला येथे मिरवणूक काढली होती. त्याचवेळी खलिस्तान समर्थक शीख संघटनेनेही मिरवणूक काढली होती.
शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी यावेळी खलिस्तान मुर्दाबादच्या घोषणा दिल्या तर दुसऱ्या गटाने खलिस्तान्याच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या, त्यानंतर दोन्ही गटातील लोकांनी तलवारी बाहेर काढल्या आणि एकमेकांवर दगडफेक केली. या हल्ल्यात ४ ते ५ लोक जखमी झाले आहेत.
या वादात ३ ते ४ लोक जण जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेना आणि खलिस्तान समर्थक संघटनांना मिरवणूक काढण्याची परवानगी नव्हती. त्यानंतरही दोन्ही गटाकडून मिरवणूक काढण्यात आली.
पटियाला जिल्ह्याच्या आयुक्त साक्षी साहनी यांनी संवादाने प्रश्न सोडवता येतील. असं सांगत सर्वांना शांतता राखण्याचे आवाहन केलं आहे. पंजाब गेली अनेक वर्ष शीख दहशतवाद्यांच्या विळख्यात आहे. त्यामुळे हजारो निरपराध लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळं नव्यानं सत्तेत आलेल्या आप सरकारला कायदा सुव्यवस्था राखणं गरजेचं आहे.