Home > Max Political > 'आम्ही इतिहास चिवडत बसत नाही'- संजय राऊत

'आम्ही इतिहास चिवडत बसत नाही'- संजय राऊत

आम्ही इतिहास चिवडत बसत नाही- संजय राऊत
X

बेळगावमध्ये मराठी लोक एकत्र झालेले आहेत बेळगावात भगवा पुन्हा एकदा फडकणार आहे,बेळगावमध्ये सध्या जे वातावरण आहे ते पाहता बेळगावात महाराष्ट्र एकीकरण समिती व त्यांचे मित्र असे मिळून त्या ठिकाणी भगवा फडकवतील असा विश्वास शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला.

त्रिशंकू परिस्थिती झाली तर काय करता येईल , सोबतच महाराष्ट्र एकीकरण समितीला यश मिळू नये यासाठी कर्नाटक सरकारने बरेच उपद्व्याप केलेत,मात्र जनतेचा कौल देखील महत्वाचा आहे आणि तो आम्हाला मिळेल असं राऊत म्हणाले.ते पत्रकारांशी संवाद साधताना बोलत होते.

दरम्यान राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना आलेला लूक आउट नोटीस बद्दल बोलताना देशमुख यांना पहिल्यांदा नोटीस आलेली नाही, याआधी अनेकदा लूक आऊट बजावली असल्याचे म्हणत राज्यात अनेकांना लुक आऊट नोटीस आली आहे.हा कायदेशीर मुद्दा आहे आणि याबाबत कायद्याची लढाई सुरू आहे त्यात वेट अँड वॉच करणं महत्त्वाचं आहे असं राऊत म्हणाले.

त्यांना आम्ही शिवचरित्र पाठवू

कोथळा बाहेर काढण्याच्या वक्तव्यावरून भाजप आपल्यावर गुन्हा दाखल करण्याच्या तयार आहेत असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता, भाजपने पाठीत खंजीर खुपसण्याची भाषा केली, त्यामुळे महाराष्ट्राची पाठीत खंजीर खुपसण्याची तर समोरून वार करण्याची परंपरा आहे इतिहास आहे, या इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी आम्ही त्यांना शिवचरित्र पाठवू असं उत्तर राऊत यांनी दिलं.

हे शिवचरित्र त्यांनी वाचलं पाहिजे म्हणजे त्यांना कोथळा काढणे नेमकं काय ? हे समजेल मग याबद्दल आपण चर्चा करू , आम्ही इतिहास अभ्यासक आहोत आम्ही इतिहास चिवडत बसत नाही असा टोला राऊत यांनी भाजपला लगावला.

Updated : 6 Sept 2021 11:52 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top