Home > Max Political > शरद पवार यांनी रिटायर व्हावे ; अजित पवारांच्या वक्तव्यावर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया

शरद पवार यांनी रिटायर व्हावे ; अजित पवारांच्या वक्तव्यावर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया

शरद पवार यांनी रिटायर व्हावे ; अजित पवारांच्या वक्तव्यावर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया
X

अजित पवार यांनी शरद पवार यांच्या वयासंदर्भात केलेल्या वक्तव्यावर विचारले होते. शरद पवार यांनी रिटायर व्हायला हवं असं अजित पवार म्हणाले होते. उद्धव ठाकरे यांनी याबाबत बोलताना म्हटलं की, हे अत्यंत वाईट विधान होतं. असं बोलणं मला पटलेलं नाही. तुम्हाला सगळं काही दिलं त्यांना असं बोलणं हे मला पटलं नाही.

उद्धव ठाकरे म्हणाले की, शरद पवार यांनी रिटायर व्हावं असं बोलणं हे अत्यंत वाईट असं मत होतं. कारण शेवटी ज्यांच्याकडून आपण सर्वकाही घेतो त्यांच्याबद्दल असे उद्गार काढणं हे आपल्या संस्कृतीला शोभा देणारं नाही. नेहमी आपण वडीलधाऱ्यांचा मान, आदर, सन्मान ठेवतो. आणि तो ठेवलाच पाहिजे. वय झालं म्हणजे काय? मग आशीर्वाद कोणाकडून घ्यायचे? हे त्यांचं वक्तव्य मला आवडलं नाही.

Updated : 27 July 2023 2:12 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top