प्रफुल पटेल यांच्याविषयी शरद पवार यांनी दडपशाही केली- सुप्रिया सुळे
X
राष्ट्रवादी कुणाची? यावर निवडणूक आयोगात पहिल्या दिवशी सुनावणी पार पडली. यानंतर बोलताना प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवार यांनी हुकूमशाही पद्धतीने निर्णय घेतल्याचे म्हटले. त्यावर सुप्रिया सुळे यांनी प्रत्युत्तर दिले.
शरद पवार हे दडपशाहीने वागत असल्याची टीका प्रफुल्ल पटेल यांनी केली होती. त्यावर सुप्रिया सुळे यांनी बोलताना शरद पवार यांनी दडपशाही केल्याचं वक्तव्य केलं.
यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या, शरद पवार यांच्यावर प्रफुल्ल पटेल यांनी दडपशाहीचा आरोप केला. खरंच हा आरोप खरा आहे. प्रफुल्ल पटेल यांना राज्यसभेचं तिकीट द्यायचं होतं. त्यावेळी आत्ता त्यांच्यासोबत असलेल्या अनेकांचा प्रफुल्ल पटेल यांना विरोध होता. पण तरीही शरद पवार यांनी बहुतांश आमदारांचा विरोध असतानाही प्रफुल्ल पटेल यांना तिकीट दिले आणि आमदारांवर दडपशाही केली.
त्याआधीही ज्यावेळी प्रफुल्ल पटेल यांचा पराभव झाला होता. त्यावेळीही प्रफुल्ल पटेल यांना मंत्री करण्यात आलं. त्यावेळीही दुसरं कुणाला संधी देण्याऐवजी शरद पवार यांनी प्रफुल्ल पटेल यांना संधी दिली. त्यामुळे प्रफुल्ल पटेल यांचा आरोप खरा आहे. शरद पवार यांनी प्रफुल्ल पटेल यांना संधी देऊन इतरांवर दडपशाही केली, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.