Home > Max Political > मुंबईहून फोन आला आणि पोलिसांचा दृष्टिकोन बदलला या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी व्हावी - शरद पवार

मुंबईहून फोन आला आणि पोलिसांचा दृष्टिकोन बदलला या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी व्हावी - शरद पवार

मुंबईहून फोन आला आणि पोलिसांचा दृष्टिकोन बदलला या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी व्हावी - शरद पवार
X

मुंबईत एकीकडे इंडिया आघाडीची बैठक सुरू असताना दुसरीकडे जालना जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी आंदोलन चालू होतं या दरम्यान या आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला होता. आज याचे पडसाद संपूर्ण राज्यभर उमटले याच पार्श्वभूमिवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी या आंदोलकांची भेट घेतली. विचारपूस करत असताना समजल की मुंबईहून फोन आला आणि पोलिसांचा दृष्टिकोन बदलला असल्याचं शरद पवार यांनी सांगितले.

दरम्यान या आंदोलकांची ''चर्चा सुरू असताना एकदम मोठा पोलीस फोर्स बोलावला गेला. मुंबईवरून सूचना आल्या आणि पोलिसांचा दृष्टिकोन बदलला'', असं म्हणत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी वेगळाच संशय व्यक्त केला आहे. पवार म्हणाले की, ''पोलिसांनी एकदम लाठी हल्ला सुरू केला. हवेत गोळीबार केला, छोटे छारे गोळीबार केला. काही जखमी लोकांच्या अंगावरील चारे ऑपरेशन करून काढले. निषपाप नागरिकांना कशी वागणूक दिली, याचा हा अनुभव आहे.'' या घटनेवर बोलताना शरद पवार म्हणाले की, झालेला प्रकार अतिशय गंभीर आहे. संकटात असलेल्या लोकांना धीर दिला नाही, तर हा प्रकार संपूर्ण महाराष्ट्रात पसरण्याची भिती होती. त्यामुळे आम्ही रात्री इकडे यायचं ठरवलं. ते म्हणाले, बळाचा वापर करताना महिला, लहान मुले बघितली गेली नाही. हवा तसा बळाचा वापर केला गेला.

शरद पवार म्हणाले की, ''मोबाईल मधल्या व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसतंय की, लोक बसलेले असताना पोलीस दलाचे प्रतिनिधी येतात आणि काही वेळाने लाठी हल्ला करतात. पोलिसांवर हल्ला झाला असं दिसत नाही. पोलिसांनी हल्ला केला असं दिसतंय. मी पोलिसांना दोष देत नाही, ते त्यांचं काम करतायत. मात्र याची न्यायालयीन चौकशी व्हावी. मुंबईहून फोन आला आणि पोलिसांचा दृष्टिकोन बदलला. मात्र कोणाचा फोन आला, याची माझ्याकडे माहिती नाही. पण तिथे काही लोक गृहमंत्र्यांच्या नावाने घोषणा देत होते.'' असं शरद पवार समाज माध्यमांशी बोलत असताना म्हणाले आहे.

Updated : 2 Sept 2023 7:55 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top