शरद पवार म्हणतात, आमच्या अनेक सहकाऱ्यांच्या अंगात यायला लागलंय...
शरद पवारांचा हा रोख नक्की कोणाकडे?
X
आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांच्या हस्ते शेंडी येथे माजी आमदार दिवंगत नेते यशवंत भांगरे यांच्या पुतळ्याचं त्यांच्या हस्ते उद्घाटन झालं. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस मधून भाजपमध्ये गेलेल्या माजी मंत्री मधुकर पिचड यांचं नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला.
या भागातील सर्व नेते एकजुटीने सोबत आले. मी सर्व गोष्टी केल्या, मात्र एक दीड वर्षापासून आमच्या अनेक सहकाऱ्यांच्या अंगात यायला लागलं.
"राज्यातील जनतेला पक्ष बदलाची भूमिका आवडत नाही. विधानसभेला मी अकोल्यात सभा घेतली. त्यावेळी जनतेच्या मनातल कळलं होतं. जनतेला परिवर्तन हवं होतं, ते झालं आहे. अकोले येथील अगस्ती सहकारी साखर कारखाना कर्जाच्या बोजाखाली असल्याची माहिती मिळाली. कारखान्यावर २०० कोटींचं कर्ज झालं. जे या कर्जाला जबाबदार आहेत ते शुक्राचार्य बाजुला करा. शुक्राचार्यांना बाजूला केल्यास कारखाना चालवण्यासाठी सर्व ती मदत मी करतो.
असं म्हणत पवार यांनी मधुकर पिचड यांच्यावर जोरदार निशाणा साधला.