Sudhir Mungantiwar | मराठा आरक्षण मागितले म्हणून त्यांना पक्षातून काढणारे शरद पवार
X
देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारां विषयी केलेले वक्तव्य तर्क संगत असून मराठा आरक्षणावरून शरद पवार आता पर्यंत काय काय बोलले त्याचे व्हीडिओ अद्यापही आहेत. तर मराठा आरक्षण मागितले म्हणून त्यांना पक्षातून काढणारेही शरद पवारच आहेत.तर चारवेळा मुख्यमंत्र्यांनी असणाऱ्या शरद पवारांनी त्यावेळी मराठ्यांना का आरक्षण दिल नाही /
मराठा आरक्षणासंदर्भात तोडगा काढण्यासाठी सरकार प्रयत्नरत असे स्पष्ट मत सुधार यांनी व्यक्त केले. दोन समूहामधला वादविवाद राज्याच्या प्रगतीमध्ये बाधक ठरू शकतो. त्यामुळेच माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मराठा आरक्षण देण्यासंदर्भात कार्यवाही करत आहेत. मराठा आरक्षणाचा प्रश्न घेऊन सत्तेची सीडी चढण्याचा प्रयत्न विरोधक करत आहेत. महाराष्ट्रामध्ये अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न विरोधक करत आहेत. शरद पवारांनी शालिनीताई पाटील यांना मराठा आरक्षणाचा मुद्दा मांडला म्हणून पक्षातून काढून टाकले होते.