Home > Max Political > छगन भुजबळ यांना मोठा दिलासा...महाराष्ट्र सदन घोटाळाप्रकरणी निर्दोष मुक्तता

छगन भुजबळ यांना मोठा दिलासा...महाराष्ट्र सदन घोटाळाप्रकरणी निर्दोष मुक्तता

छगन भुजबळ यांना मोठा दिलासा...महाराष्ट्र सदन घोटाळाप्रकरणी निर्दोष मुक्तता
X

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांना मोठा दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी छगन भुजबळ यांची सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. या प्रकरणात आपल्याला दोषमुक्त करण्यात यावे यासाठी छगन भुजबळ यांनी अर्ज केला होता. भुजबळ यांच्यासोबत त्यांचा पुतण्या समीर भुजबळ यांनीही हा अर्ज केला होता.

आपल्यावरील आरोपात कोणतेही तथ्य नाही, असा दावा भुजबळांनी केला होता. गुरुवारी या संदर्भात झालेल्या सुनावणीमध्ये न्यायालयाने भुजबळांविरोधीत ACB कडे महाराष्ट्र सदन घोटाळ्यात कोणतेही ठोस पुरावे नसल्याने भुजबळ यांची कोर्टाने निर्दोष मुक्तता केली आहे.

महाराष्ट्र सदन घोटाळ्यात छगन भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबियांविरुद्ध ठोस पुरावा असल्याचा दावा ACBने कोर्टात केला होता. तसेच भुजबळ यांना दोषमुक्त करण्यास विरोध केला होता. या प्रकरणी मूळ तक्रारदार अंजली दमानिया यांनीही आपली बाजू ऐकण्याची मागणी कोर्टाकडे केली होती, पण कायदेशीर प्रक्रियेचा अवलंब करण्याची सूचना कोर्टाने त्यांना केली आहे.

काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारमध्ये भुजबळ सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना विविध टेंडरमधून भुजबळ कुटुंबीयांना त्यांच्या कंपन्यांच्या माध्यमातून रोख रक्कम लाच म्हणून देण्यात आल्याचा आरोप झाला होता.

Updated : 9 Sept 2021 2:09 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top