शरद पवार गटाला मिळालं स्वतंत्र नाव; हे असेल शरद पवारांच्या पक्षाचे नाव
X
शरद पवारांच्या पक्षाला निवडणूक आयोगाकडून अखेर नविन नाव देण्यात आलेलं आहे. "राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी - शरदचंद्र पवार" असं नाव देण्यात आलेलं आहे. राज्यसभेच्या निवडणूकीसाठी तात्पुरत्या स्वरूपात हे नाव देण्यात आलेलं आहे. परंतू त्यानंतरही हे नाव पुढं वापरता येऊ शकतं का ? याचा निर्णय निवडणूक आयोग निवडणूकीनंतर देईल. त्यामूळे तात्पुरत्या स्वरूपात 'राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी - शरद पवार' असं नवं नाव शरद पवारांच्या गटाला देण्यात आलेलं आहे. खरंतर पक्षाच्या नावासाठी तीन पर्याय दिलेले होते, "नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी - शरदचंद्र पवार", "नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी - शरदराव पवार" आणि "एन सी पी - शरद पवार" परंतु पहिला जो क्रमांक दिलेला आहे तो अनुक्रमीय(First Reference) होता आणि तेच निवडणूक आयोगाने ग्राह्य धरून विचारात घेतलेलं आहे.
त्याचबरोबर पक्षाला दिलेलं हे जे नाव आहे त्याला पुढे वापरण्यासाठी कोणतीही अडचण नसणार आहे. हे नाव शरद पवार गट वापरू शकतं त्यामूळे प्रथम क्रमांकावर दिलेलं हे नाव भविष्यात अंतिमतः निश्चित केलं जाऊ शकतं, जसं की उध्दव बाळासाहेव ठाकरे(उबाठा) हे नाव आहे, त्याच धरतीवर शरद पवार गटाला हे नाव मिळालेलं आहे.
दुसरा मुद्दा जो आहे, तो म्हणजे चिन्हाचा, तर शरद पवार गटाला पक्षाचे चिन्ह म्हणून वटगृक्ष हे चिन्ह प्राधान्याने दिलं असल्याची माहिती मिळतेय. परंतू राज्यसभेमध्ये ज्या निवडणूका होतात त्या चिन्हांच्या आधारावर होत नाहीत ते केवळ मतदान होतं त्यामूळे सध्या चिन्हाचा इथं प्रश्न येत नाहीये. परंतु कायमस्वरूपीसाठी चिन्ह जर मिळवायचं असंल तर त्यासाठी सुध्दा प्राधान्यक्रम हा शरद पवार गटाने तयार केलेला आहे ज्यामध्ये प्रथम प्राध्यान्यक्रम हा वटगृक्षाला दिलेलं यावर निवडणूक आयोग आपला निर्णय लवकरच देईल अशी माहिती मिळतेय.