कार्याध्यक्ष पदी निवड झाल्यानंतर प्रथमच सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रीया
X
नवी दिल्लीत काल (१० जून) राष्ट्रवादीचा (NCP) २५ वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यानिमित्ताने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार(Sharad Pawar) यांनी महत्वाचा निर्णय घेतला. यावेळी प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यांना राष्ट्रवादी कार्यकारी अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे. यावर सुप्रिया सुळे यांनी पहिली प्रतिक्रीया दिली आहे.
दरम्यान सुप्रिया सुळे यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या " भारतीय संविधानाच्या चौकटीत राहुन आपण देशाची सेवा, राज्याची सेवा कशी करु शकतो याकडे लक्ष देणार आहे. माझ्या कामाचा रिपोर्ट हा प्रफुल्ल पटेल आणि शरद पवार यांना असल्याचं त्यांनी सांगितले. जे काही निर्णय राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात होतात ते सर्वांना विचारुन चर्चा करुनच होत असतात. यावेळी त्यांनी अजित पवार हे महाराष्ट्रातील विरोधी पक्ष नेते आहेत. विरोधी पक्षनेत्यांची जागा ही मुख्यमंत्र्यांच्या बरोबरीने असते. विरोधी पक्षाची भुमिका ही खुप मोठी असल्याचं सांगत त्यांनी अजित पवारांच कौतुक केलंय.
त्या पुढे म्हणाल्या जेव्हा एक बोट माझ्याकडे येतं तेव्हा तीन बोट ही त्यांच्याकडे असतात हे विसरुन चालणार नाही. सोयीप्रमाणे लोकांना पवारांची घराणेशाही दिसते. भाजप ने विरोधी पक्षांना संपवायच्या आधी स्वत:च्या पक्षांना आधी संपवलेलं आहे, अशी टीका यावेळी त्यांनी केली.