Home > Max Political > आदित्य ठाकरेंच्या आरोपांवर संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया...! काय म्हणाले सिरसाट? वाचा

आदित्य ठाकरेंच्या आरोपांवर संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया...! काय म्हणाले सिरसाट? वाचा

आदित्य ठाकरेंच्या आरोपांवर संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया...! काय म्हणाले सिरसाट? वाचा
X

ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी यवतमाळ मध्ये उमेदवार संजय देशमुख यांचा नामांकनाचा अर्ज भरताना, शिंदे गटाच्या ४० आमदारांबद्दल म्हणाले होते की, गद्दारी आणि बंडगोरी यामध्ये फरक असतो. रामटेकमधून कृपाल तुमानेंचं तिकीट नाकारल्यानंतर शिंदे गटाच्या ४० गद्दारांनी सुध्दा आता समोरचा विचार केला पाहिजे. ज्या-ज्या ठिकाणी गद्दारांना तिकीटे मिळाली त्या जागी वेगळा निकाल येईल. असं आदित्य ठाकरे यांनी म्हटले होते. ठाकरेंच्या या वक्तव्यावर शिंदे गटाचे खासदार संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली.

काय म्हणाले संजय सिरसाट?

शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या घराला आता दरवाजेच राहिले नाहीत. पक्षातील सारे नेते हे दरवाजे तोडून बाहेर पडले आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे परत कोणी जाण्याचा प्रश्नच कुठे येतो असा दावा शिवसेना शिंदे गटाचे खासदार संजय शिरसाट यांनी केला आहे.

उध्दव ठाकरे यांच्या गटातील खासदार संजय राऊत हे स्वतःच गद्दार आहेत. त्यामुळे गद्दार कोण? हे ठरवण्याचा त्यांना अधिकार नाही. संजय राऊत यांनीच पक्ष संपवला आहे, अशी उलट प्रतिक्रिया संजय शिरसाट यांनी दिली आहे.

दरम्यान, शिरसाट म्हणाले की, महायुतीमध्ये कोणत्याही प्रकारची तक्रार किंवा भांडण नाही. आमच्यामध्ये कुठलेही भांडण नाही तर चर्चा सुरू आहेत, पक्षाकडून लवकरच सर्व उमेदवारांची घोषणा होणार असल्याचं शिरसाट यांनी सांगितलं.

महाविकास आघाडीचा आमच्या किती तरी दिवस अगोदरपासून जागेसंदर्भात वाटाघाटी सुरू केल्या होत्या. मात्र, त्यांचा अद्यापही निर्णय झालेला नाही, असं शिरसाट म्हणाले.

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेसाठी आम्ही कायम आग्रही

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेच्या उमेदवारी विषयी बोलताना नारायण राणे यांच्या उमेदवारीसंदर्भात संजय शिरसाट यांनी आपली भूमिका व्यक्त केली. ते म्हणाले की, नारायण राणेंनी आपल्या प्रचाराला सुरुवात केली असली तरी याबाबतचा अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा असल्याचे आमदार शिरसाट म्हणाले. रत्नागिरी सिंधुदु्र्ग मधील जागेसाठी आम्ही शेवटपर्यंत आग्रही राहणार असा दावा देखील त्यांनी केला.

दरम्यान शिरसाट म्हणाले की, आम्हाला अपेक्षा आहे की, त्या जागेवर शिवसेनेचा उमेदवार दिला जाईल. परंतु तरी सुध्दा वरिष्ठ नेते जो निर्णय घेतील तो आम्हा सर्वांना मान्य असेल, असंही शिरसाट म्हणाले.

Updated : 2 April 2024 4:30 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top