Home > Max Political > ब्राम्हण समाजाचा मुख्यमंत्री झाला पाहिजे, रावसाहेब दानवेंपाठोपाठ रामदास आठवले यांचे वक्तव्य

ब्राम्हण समाजाचा मुख्यमंत्री झाला पाहिजे, रावसाहेब दानवेंपाठोपाठ रामदास आठवले यांचे वक्तव्य

राज्यात भाजप विरुध्द महाविकास आघाडी (BJP Vs MVA) संघर्ष रंगला आहे. त्यातच भाजपकडून सातत्याने सरकार पडणार असल्याचा दावा केला जात आहे. त्यापार्श्वभुमीवर रावसाहेब दानवेंपाठोपाठ रामदास आठवले यांनी ब्राम्हण मुख्यमंत्री होण्याबाबत वक्तव्य केले आहे. (Ramdas Athwale statement)

ब्राम्हण समाजाचा मुख्यमंत्री झाला पाहिजे, रावसाहेब दानवेंपाठोपाठ रामदास आठवले यांचे वक्तव्य
X

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी गेल्या काही दिवसांपुर्वी ब्राम्हण समाजाचा मुख्यमंत्री व्हावा, अशी इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर राज्यात चर्चेला उधाण आले होते. तर रावसाहेब दानवे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे दानवे यांच्यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी टीकेची झोड उठवली होती. तर त्यानंतर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनीही ब्राम्हण मुख्यमंत्री होण्याबाबत वक्तव्य केले आहे.

केंद्रीय सामाजिक राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले की, महाविकास आघाडीचे सरकार जनतेला न्याय देण्यात अपयशी ठरले आहे. कारण या सरकारमधील नेते एकमेकांवर कुरघोडी करत आहेत. तसेच या सरकारमध्ये काँग्रेस पक्षाला नेहमी डावलले जात आहे. त्यामुळे नाना पटोले यांनी सरकारचा पाठींबा काढून घ्यावा, अशी विनंती मी नाना पटोले यांना करणार असल्याचे रामदास आठवले म्हणाले. तसेच पढे बोलताना रामदास आठवले म्हणाले की, सरकार पडल्यानंतर सरकार बनवण्याची आमची तयारी आहे. तर ब्राम्हण समाजाचा व्यक्ती राज्याचा मुख्यमंत्री झाला पाहिजे, याला माझाही पाठींबा आहे, असे वक्तव्य रामदास आठवले यांनी केले.

देवेंद्र फडणवीस (Devendra fadanvis) हे सर्वांना पुढे घेऊन जाणारे नेते आहेत, असे मत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले.

यावेळी बोलताना रामदास आठवले यांना राज ठाकरे (Raj Thackeray) कोणाचंही ऐकणारा नेता नाही. त्यामुळे भाजपचा राज ठाकरे यांच्या भुमिकेला पाठींबा नसल्याचे वक्तव्य आठवले यांनी केले. राज ठाकरे यांनी भगवी शाल आवश्य पांघरावी. पण राज्याची शांतता बिघडवण्याचे काम करू नये, असा सल्लाही रामदास आठवले यांनी राज ठाकरे यांना दिला.

आठवले म्हणाले, मी राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी करून निवडणूक लढवली. पण मी राष्ट्रवादी किंवा काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढवली नाही. त्याबरोबरच आगामी काळातही मी रिपब्लिकन पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवणार आहे, असे सांगत रामदास आठवले यांनी आपली भुमिका स्पष्ट केली.

Updated : 9 May 2022 8:01 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top