राज ठाकरेंचा इशारा, मनसैनिकांकडून ‘टोल’ नाके टार्गेटवर
X
सध्या टोल दरवाढीवरून राज्याचं राजकारण तापलंय. टोल मुक्त महाराष्ट्राच्या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मुलुंड टोल नाक्यावर ‘टोलचा झोलं’ अशा आशयाचे बॅनेर लावतं शांततेत आंदोलन पुकारले होते. मात्र, या आंदोलनाला आता हिंसक वळण लागल आहे. याचे पडसाद संपुर्ण राज्यभरात उमटायला सुरूवात झालीय. मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या इशाऱ्यानंतर आता मनसे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत.
दरम्यान, या संदर्भात राज ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेत टोल मुक्त महाराष्ट्र केला नाहीत तर टोल नाके जाळण्याचा थेट सरकारला इशारा दिला होता. त्यानंतर या आदोलनाला हिंसक वळण लागलंय. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अविनाश जाधव यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मुलुंड टोल नाक्यावर आधी मनसे नेते अविनाश जाधव यांनी गांधीगिरी मार्गाने आंदोलन केले. मात्र, त्यांना ताब्यात घेतल्यावर काही मनसैनिकांनी टोल नाका पेटवून देण्याचा प्रयत्न केला आहे. टोल नाक्याच्या केबिन मध्ये पेट्रोल आणि टायर पेटवून टाकण्यात आले होते. यामुळे केबिन आणि त्यातील साहित्य जाळून खाक झाल्याची माहिती समोर आली आहे. मनसैनिकांनी खालापूर टोलनाक्याजवळही जाळपोळ करण्यात आली आहे.