राज ठाकरे यांचा आयोध्या दौरा स्थगित
राज ठाकरे यांनी ५ जूनला आयोध्येला जाणार असल्याची घोषणा केली होती. त्यामुळे हा दौरा चर्चेचा विषय ठरला होता. तर हा दौरा राजकीय की धार्मिक अशा चर्चा रंगल्या होत्या. मात्र राज ठाकरे यांनी मनसे कार्यकर्त्यांना धक्का देत आयोध्या दौरा स्थगित करत असल्याची घोषणा केली आहे.
X
राज ठाकरे यांनी जाहीर केलेला आयोध्या दौरा वादात सापडला होता. तर राज ठाकरे यांनी माफी मागितल्याशिवाय त्यांना आयोध्येत पाय ठेऊ देणार नसल्याचा इशारा भाजप खासदार ब्रिजभुषण सिंह यांनी दिला होता. त्यापार्श्वभुमीवर राज ठाकरे यांनी आयोध्या दौरा तुर्तास स्थगित करत असल्याची घोषणा केली आहे.
राज ठाकरे यांनी ट्वीट करून म्हटले आहे की, तूर्तास आयोध्या दौरा स्थगित. महाराष्ट्र सैनिकांनो या यावर सविस्तर बोलू असे सांगत पुण्यातील सभेचे ठिकाणाचा पत्ता दर्शवला आहे. यामुळे राज ठाकरे यांनी जाहीर केलेला आयोध्या दौरा स्थगित करण्यात आल्याने चर्चांना उधाण आले आहे.
राज ठाकरे यांनी आयोध्या दौरा जाहीर केल्यानंतर भाजप खासदार ब्रिजभुषण सिंह यांनी उत्तर भारतीयांची माफी मागा अन्यथा आयोध्येत पाय ठेऊ देणार नसल्याचा इशारा दिला होता. तर या इशाऱ्यानंतर मोठ्या प्रमाणात वातावरण तापले होते. तसेच राज ठाकरे यांच्या विरोधात ब्रिजभुषण सिंह यांनी चलो आयोध्येचा नारा दिला होता. त्यामुळे राज ठाकरे यांचा आयोध्या दौरा वादात सापडला होता. मात्र अचानक राज ठाकरे यांनी आयोध्या दौरा रद्द केल्याने राज ठाकरे घाबरले आहेत का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
#अयोध्या #Ayodhya pic.twitter.com/rFbkDT9Is1
— Raj Thackeray (@RajThackeray) May 20, 2022