Raj Thackeray : राज ठाकरे यांची पुण्यात जाहीर सभा पण निशाण्यावर नेमकं कोण?
राज ठाकरे यांचा बहुचर्चित असा अयोध्या दौरा वादात सापडल्यानंतर स्थगित करण्याचा निर्णय राज ठाकरे यांनी घेतला. त्यामुळे राज ठाकरे यांच्यावर टीका केली जात आहे. त्यापार्श्वभुमीवर राज ठाकरे पुण्यात जाहीर सभेला संबोधित करणार आहेत. त्यामुळे राज ठाकरे यांच्या निशाण्यावर कोण? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
X
राज ठाकरे यांनी अयोध्या दौरा जाहीर केल्यानंतर भाजप खासदार बृजभुषण सिंह यांनी जोरदार विरोध केला. उत्तर भारतीयांची माफी मागा अन्यथा अयोध्येत पाय ठेऊ देणार नसल्याचे ब्रिजभुषण सिंह यांनी म्हटले होते. त्यामुळे राज ठाकरे यांचा दौरा वादात सापडला होता. त्यापार्श्वभुमीवर राज ठाकरे यांनी अयोध्या दौरा स्थगित करत असल्याची घोषणा ट्वीटरवरून केली. त्यामुळे राज ठाकरे खासदार ब्रिजभुषण सिंह यांना घाबरले अशी टीका शिवसेनेकडून केली जात आहे. त्यामुळे राज ठाकरे पुण्यातील सभेतून टीकाकारांना नेमकं काय उत्तर देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावरून वाद सुरू असताना राज ठाकरे यांच्या तब्बेतीचे कारण देत अयोध्या दौरा स्थगित करत असल्याची घोषणा मनसेने केली होती. त्यानंतर राज ठाकरे यांच्यावर शिवसेनेने जोरदार टीका केली. तर राज ठाकरे यांच्या सभेआधी पुण्यात शिवसेनेने मनसेला धक्का देत मनसे कार्यकर्त्यांना शिवसेना प्रवेश घडवून आणला. त्यामुळे राज ठाकरे पुण्यातील सभेत काय बोलणार याकडे संपुर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
असली की नकली हिंदूत्व
राज ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांनी उपस्थित केलेला मशिदीवरील भोंग्यांचा मुद्दा उपस्थित करत हिंदूत्वाची मशाल हाती घेतली होती. त्यानंतर राज ठाकरे हिंदूत्वाच्या मुद्द्यावर आक्रमक झाले होते. त्यातच राज ठाकरे यांनी शिवसेनेचे हिंदूत्व बेगडी असल्याची टीका केली होती. त्यानंतर शिवसेनेने हिंदूत्वाचा मुद्दा पकडून पुन्हा राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. त्यापाठोपाठ राज ठाकरे यांनी अयोध्या दौरा जाहीर केला. तर राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याच्या घोषणेनंतर आदित्य ठाकरे यांचाही अयोध्या दौरा जाहीर करण्यात आला. त्यानंतर असली विरुध्द नकलीचे बॅनर लागले होते. त्यामुळे या मुद्द्यावर राज ठाकरे बोलणार का? हे सुध्दा महत्वाचे ठरणार आहे.
अयोध्या दौऱ्याला स्थगीती का?
राज ठाकरे यांनी अयोध्या दौरा स्थगित करण्यासाठी तब्बेतीचे कारण दिले आहे. मात्र हा दौरा का स्थगीत करण्यात आला यावर राज ठाकरे आपल्या भाषणात उत्तर देण्याची शक्यता आहे. त्यातच ब्रिजभुषण सिंह यांनी केलेल्या विरोधावरही राज ठाकरे बोलण्याची शक्यता आहे. त्यामुळे 10 वा. पुण्यात पार पडणाऱ्या सभेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महागाईवर काय बोलणार?
राज ठाकरे यांच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभुमीवर केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरचा कर कमी करत सामान्यांना दिलासा दिला आहे. मात्र राज्य सरकारने अजूनही कोणत्याही प्रकारचा दिलासा दिला नाही. तसेच देशात महागाईचा आगडोंब उसळला आहे. त्यामुळे राज ठाकरे इंधन दरावरून राज्य सरकारवर निशाणा साधणार की महागाईवरून केंद्र सरकारवर हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.