मनसे प्रमुख राज ठाकरे 5 जून रोजी अयोध्येला जाणार, 1 मे रोजी औरंगाबादमध्ये सभा घेणार
X
मनसे (Mns)अध्यक्ष राज ठाकरे(Raj thackrey) हे सध्या पुणे दौऱ्यावर आहेत. शनिवारी हनुमान जयंतीनिमित्त सामूहिक हनुमान चालिसा पठण केल्यानंतर राज ठाकरे पत्रकार परिषद घेतली.पत्रकार परिषदेत अनेक घोषणा केल्या.
५ जून रोजी माझ्या सर्व सहकाऱ्यांसह मी अयोध्येला जाणार आहे. पाच तारखेला अयोध्येला पोहचून तिथे दर्शन घेणार आहे, अशी घोषणा राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेतून केली आहे.
सध्या राज ठाकरे(Raj thackrey)हिंदुत्वाच्या मुद्यावर आक्रमक झालेले दिसतायत.भोंग्याचा विषय धार्मिक नसून सामाजिक आहे.राज ठाकरेंनी ३ मे पर्यंत भोंगे उतरवण्यास अल्टीमेटम दिला होता.त्यानंतर आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत भोंगे उतरवले नाही तर आमच्याही आरत्या लाऊडस्पीकरवर ऐकायला लागतील, असं वक्तव्य केलं आहे.
माझ्या सभेमध्ये मी स्पष्ट केले होते की, हा सामाजिक विषय आहे. त्याच्याकडे त्याच अंगाने पाहणे आवश्यक आहे. या सगळ्या गोष्टींचा मुस्लिमांनाही त्रास होत आहे. अनेक वर्षे हा विषय असाच राहिला आहे. तुम्ही पाच वेळा भोंगे लावणार असाल तर दिवसातून पाच वेळा आम्ही मशिदीसमोर हनुमान चालिसा लावू, असे राज ठाकरे म्हणाले.
देशभरातल्या हिंदू बांधवांनो तयार राहा. ३ मे पर्यंत जर त्यांना समजले नाही तर जशास तसे उत्तर देणे आवश्यक आहे. मनसे(MNS)पक्ष म्हणून आमची सर्व बाजूंनी तयारी सुरु आहे. महाराष्ट्रात आणि देशात कोणत्याही प्रकारच्या दंगली नकोत. माणुसकीच्या नात्याने मुस्लिम धर्मियांनी या गोष्टींचा विचार करणे आवश्यक आहे. त्यांच्या प्रार्थनेला कोणीही विरोध केलेला नाही.'
सगळ्या मशिदींवरचे लाऊडस्पीकर अनाधिकृत आहेत तर आमच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोष्टी तुम्ही अनाधिकृत कशा मानता. मशिदिवरील भोंगे शांतता भंग करत असतील तर त्यांना परवानगी देऊ नका असे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. मुस्लिम समाजालाही समजले पाहिजे की या देशापेक्षा त्यांचा धर्म मोठा होऊ शकत नाही. लोकांना त्याचा त्रास होत आहे याची कल्पना त्यांना येणे आवश्यक आहे.
त्याचबरोबर राज ठाकरेंनी आणखी एक घोषणा केली.१ मे महाराष्ट्र दिनी औरंगाबाद मध्ये जाहीर सभा घेणार असल्याचे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.आता महाराष्ट्र दिनाच्या सभेनंतर राज ठाकरे भोंग्याच्या मुद्द्यावर आक्रमक होणार आहेत की काय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.