Home > Max Political > Rahul Gandhi यांची खासदारकी रद्द

Rahul Gandhi यांची खासदारकी रद्द

देशाच्या राजकारणात सर्वात मोठी घटना घडली. कॉग्रेस नेते तथा वायनाड इथले खासदार राहुल गांधी यांची लोकसभेतील सदस्यता रद्द करण्यात आली आहे.

Rahul Gandhi यांची खासदारकी रद्द
X

देशाच्या राजकारणात सर्वात मोठी घटना घडली. कॉग्रेस नेते तथा वायनाड इथले खासदार राहुल गांधी यांची लोकसभेतील सदस्यता रद्द करण्यात आली आहे.

२०१९ मध्ये राहुल गांधी यांनी वायनाड इथल्या एका सभेत ‘मोदी आडनाव’ संबंधात एक वादग्रस्त वक्तव्य केल्याचा ठपका ठेवत त्यांना मानहानीच्या खटल्यात सुरतच्या न्यायालयानं दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. कायद्यानुसार एखाद्या संसदीय सदस्याला दोन वर्षांपेक्षा अधिकची शिक्षा झाली असेल तर त्यांचं सदस्यत्व रद्द करण्यात येते. या नियमानुसारच राहुल गांधी यांची सदस्यता लोकसभेच्या सचिवालयानं रद्द केली आहे.

मोदी सरकारविरोधात आक्रमकपणे भूमिका मांडल्याने राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचा आरोप काँग्रेस नेत्यांनी केला आहे.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे केरळमधील वायनाड मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आले. बुधवारी राहुल गांधींना सूरत न्यायालयाने दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली, ज्यामुळे त्यांचं संसदीय सदस्यत्व रद्द कऱण्यात आलं.

देशातील सक्षम न्यायालयाने लोकप्रतिनिधीला किमान दोन किंवा त्यापेक्षा जास्त वर्षांची शिक्षा सुनावल्यावर त्यांचं संसदेतील सदस्यत्व त्याचक्षणी रद्द होईल असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहेत.

राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याच्या निर्णयाबाबत लोकसभा सचिवालयाने काढलेल्या आदेशामध्ये माहिती देण्यात आली आहे. हे पत्र राहुल गांधी, राष्ट्रपती भवन, पंतप्रधान कार्यालय, राज्यसभा, निवडणूक आयोग आणि सर्व मंत्रालये/विभागांना सचिव उत्पल कुमार सिंह यांच्या नावाने सादर करण्यात आले आहे. या पत्रानुसार आणि भारतीय संविधानाच्या लोकप्रतिनिधी कायदा, 1951 च्या कलम 10 (1) (ई) नुसार, 23 मार्च 2023 रोजी राहुल गांधींची उमेदवारी रद्द करण्यात आली आहे.

Updated : 24 March 2023 3:18 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top