पंतप्रधानांचे अश्रू लोकांचे जीव वाचवू शकले नाही, राहुल गांधींचा मोदींवर निशाणा
X
आज कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेतली. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतून देश बाहेर पडत असताना तिसरी लाट येण्याची शक्यता शास्त्रज्ञ व्यक्त करत आहेत. या संदर्भात राहुल गांधी पुन्हा एकदा सतर्क देशाला पुन्हा एकदा सतर्क केलं आहे. या संदर्भात राहुल गांधींनी व्हाइट पेपर जारी केला आहे.
दुसऱ्या लाटेत ज्या लोकांचे मृत्यू झाले. ते रोखता आले असते. मात्र, सरकारने ऑक्सिजनची निर्मिती केली नाही. पंतप्रधान रडले. मात्र, पंतप्रधानांचे अश्रू लोकांचे जीव वाचवू शकले नाही. असं मोदींवर निशाणा साधला.
राहुल गांधी यांनी वैज्ञानिकांनी दुसऱ्या लाटे संदर्भात सतर्क केलं होतं. मात्र, सरकारने कोणतीही एक्शन घेतली नाही. आता पूर्ण देशाला माहिती आहे. तिसरी लाट येणार आहे. मात्र, आपण पुन्हा एकदा तिच चूक करत आहोत. बेड्स, ऑक्सिजन आणि इतर गोष्टींची तयारी केली नव्हती. मात्र, आता ही तयारी तिसऱ्या लाटेत करणं गरजेचं असल्याचं राहुल यांनी म्हटलं आहे.
काय आहे श्वेतपत्रिकेत? (व्हाइट पेपर)
तिसऱ्या लाटेची तयारी
दूसऱ्या लाटेत ज्या उणीवा राहिल्या त्यावर काम करण्यासंदर्भात माहिती...
लोकांना आर्थिक मदत करणं गरजेचं
तिसऱ्या लाटेत सर्वसामान्य लोकांना अडचणी येऊ नयेत म्हणून उपाययोजना
ज्याचं या कोरोनामध्ये नुकसान झालं त्यांना मदत देण्यात यावी