Home > Max Political > प.बंगाल निवडणुकीआधी प्रशांत किशोर यांचे मोदी-शाहांना आव्हान

प.बंगाल निवडणुकीआधी प्रशांत किशोर यांचे मोदी-शाहांना आव्हान

पश्चिम बंगालच्या निवडणुकीसाठी भाजपने आपली संपूर्ण ताकद पणाला लावलेली आहे. पण आता ममता बॅनर्जी यांचे राजकीय सल्लागार आणि कुशल निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी भाजपला आव्हान दिले आहे.

प.बंगाल निवडणुकीआधी प्रशांत किशोर यांचे मोदी-शाहांना आव्हान
X

पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप २००च्या वर जागा जिंकणार असा दावा केंद्री गृहमंत्री अमित शाह यांनी दोन दिवसांपूर्वी केला होता. पण आता राजकाऱणातील कुशल रणनीतीकार म्हणून प्रसिद्ध असलेल्या प्रशांत किशोर यांनी प.बंगालमध्ये भाजपला १०च्या वर जागा मिळणार नाहीत आणि तसे झाले तर आपण ट्विटर सोडून देऊ अशी घोषणा प्रशांत किशोर यांनी केली आहे. आपले हे ट्विट सेव्ह करुन ठेवावे असे आव्हानही त्यांनी दिले आहे. प्रशांत किशोर हे सध्या पश्चिम बंगलाच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे राजकीय सल्लागार आहेत.

अमित शाह यांनी नुकताच प.बंगालचा दौरा केला. त्याआधी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्यावर पश्चिम बंगालमध्ये एका रॅली दरम्यान हल्ला करण्यात आला होता. भाजपने पश्चिम बंगालमध्ये सत्तेत येण्यासाठी आपली संपूर्ण ताकद पणाला लावली आहे.

दरम्यान भाजपचे पश्चिम बंगाल प्रभारी कैलास विजयवर्गीय यांनी ट्विट करुन प्रशांत किशोर यांना उत्तर दिले आहे. "पश्चिम बंगालमध्ये भाजपाची त्सुनामी आली आहे. सरकार सत्तेवर आल्यानंतर देशाला एक रणनीतीकार गमवावा लागेल," असा टोला त्यांनी लगवाल आहे.

KAILAS TWIT

Updated : 21 Dec 2020 2:11 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top