जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी झटणारा लोकप्रिय आमदार : मंगेश कुडाळकर
X
आपल्या मतदारसंघातील प्रश्नांबरोबरच मुंबईकरांचेही जिव्हाळ्याचे प्रश्न सोडविण्याचा वसा गेली दहा वर्षे कुर्ल्याचे आमदार असलेल्या मंगेश कुडाळकर यांनी घेतला आहे. त्यांच्यातील समाजसेवी कार्यकर्ता महाविद्यालयीन जीवनापासूनच कार्यरत होता. स्थानीय लोकाधिकार समितीत काही काळ काम करताना त्यांनी स्थानिकांना न्याय मिळवून देण्यात महत्त्वाचा वाटा उचलला होता. तेव्हा फक्त तरुणांपुरतेच मर्यादित असलेले त्यांचे काम शिवसेनेतर्फे आमदार झाल्यावर आणखी विस्तारले. कुर्ला परिसरातील नागरिकांसाठी असंख्य कामे करतानाच त्यांनी पर्यावरणाचा समतोल साधण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे मुंबईतील म्हाडाच्या ५६ वसाहतींचा पुनर्विकासही मार्गी लावला. म्हाडा रहिवाशांवरील अन्यायकारक बोजा असलेले १९९८ पासूनचे वाढीव सेवाशुल्कही रद्द करवून घेतले. कलेक्टर लँडवरील घरांच्या पुनर्विकासाचा प्रश्नही त्यांनी विधानसभेत लावून धरला आहे. स्वदेशी मिलच्या कामगारांची थकीत देणी व त्यांना मिळावयाची घरे याबाबतही त्यांनी विविध पातळ्यांवर प्रयत्न करून कामगारांना न्याय मिळवून दिला
विकासाच्या कामासाठी सदैव तत्पर
शिवसेना आमदार मंगेश अनंत कुडाळकर यांनी समाजकारणाची सुरुवात वयाच्या १६व्या वर्षापासून केली. शिवसेना अंगीकृत भारतीय विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून त्यांनी महाविद्यालयीन जीवनापासूनच विविध सांस्कृतिक, कला व क्रिडा उपक्रम हाती घेतले व तरूणांच्या ऊर्जेला सकारात्मक वाव दिला. तो वसा त्यांनी आजही जपला आहे. मतदारसंघातील महिला, तरुण यांच्यासाठी कला-क्रीडा स्पर्धांचे आयोजन करणे, त्यांना पुरस्कार देणे, त्यांचे कौतुक करणे यात ते नेहमीच आघाडीवर असतात यात त्यांनी वेगळा विक्रम स्थापित केला आहे महाविद्यालयीन जीवनात समाजकारणाचे बाळकडू मिळाल्याने पुढील राजकीय जीवनात त्यांना समाजसेवेची सवयच लागली.
कालांतराने शिवसेनेत त्यांनी गटप्रमुख ते उपविभागप्रमुख या पदांवर कामे केली व लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न केले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी २००९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना उमेदवारी दिली ते अत्यंत कमी मतांच्या फरकाने पराभूत झाले, परंतु पराभवाने खचुन न जाता त्यांनी २००९ ते २०१४ दरम्यान आपले सामाजिक कार्य त्याच जिद्दीने सुरू ठेवले. त्यामुळे त्यांची लोकप्रियता ही मोठ्या प्रमाणावर वाढली. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळाल्यावर मोठ्या फरकाने ते शिवसेनेतर्फे विजयी झाले. त्यापूर्वीही पंधरा ते वीस वर्ष राजकारणात व समाजकारणात सक्रिय असल्याने त्यांना परिसराचे व नागरिकांचे प्रश्न माहिती होते. यशाने हुरळून न जाता त्यांनी हे प्रश्न जलद गतीने सोडविण्याचा सपाटा लावला सरकारचीच साथ असल्याने हे प्रश्न सोडविणे त्यांना अत्यंत सोपे गेले. परिसरातील नागरिकांचे प्रश्न सोडवितानाच मुंबईला भेडसावणारे काही प्रश्नही त्यांनी अथक परिश्रम करून सोडविले.
मतदार संघातील कार्याचा आढावा
संपूर्ण कुर्ला विभागात व्यायामशाळा, विद्यार्थ्यांकरिता अभ्यासिका, बालकांसाठी बालवाड्या ज्येष्ठ नागरिकांना विरंगुळा केंद्र, लहान मुलांसाठी बालोद्यान, वाहतुक बेटांच्या सुशोभीकरणाची कामे, सौंदर्यीकरण-सुशोभीकरण, इमारतींतील आवारांच्या लादीकरणाची कामे, विभागातील मंदिराची निर्मिती, महापालिकेमार्फत बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, मैदानातील ओपन जिम अशी असंख्य कामे आपल्या आमदार निधीतून त्यांनी केली आहेत, भविष्यात करायच्या अशा कामांची यादी मोठी आहे
म्हाडा पुनर्विकासः रखडलेली कामे पूर्ण करून मार्गी लावली
कुर्ला-नेहरूनगर विधानसभा क्षेत्रात म्हाडा वसाहती मोठ्या प्रमाणात आहेत. २०१४
च्या आधी काँग्रेस सरकारच्या उदासीन धोरणामुळे मुंबईतील ५६ म्हाडा वसाहतीतील पुनर्विकासाचे प्रकल्प ठप्प झाले होते. मंगेश कुडाळकर स्वतः म्हाडा रहिवासी असल्याने या रहिवाशांकरिता जाचक असलेले हे धोरण सुधारण्यासाठी त्यांनी सतत पाठपुरावा केला. सरकारमध्ये असूनही रहिवाशांच्या हक्कासाठी स्वतः रहिवाशांच्या साथीने ते साखळी उपोषणास बसले. या प्रयत्नांमुळे अखेर सरकारला सन २०१६ मध्ये या धोरणात सुधारणा आणावी लागली आणि सर्व म्हाडा वसाहतींचा रखडलेला पुनर्विकास मार्गी लागला.
थकीत असलेले सर्व सेवाशुल्क माफ
म्हाडा रहिवाशांच्या १९९८ पासूनच्या वाढीव थकीत सेवाशुल्काचा प्रश्नही त्यांनी असाच मार्गी लावला. शुल्क रद्द करण्यासाठी त्यांनी वारंवार तत्कालीन मूहनिर्माणमंत्री, गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव, म्हावा प्राधिकरणाचे उपाध्यक्ष यांच्याशी पत्रव्यवहार करून बैठका घेतल्या, त्यावर म्हाडामार्फत अभव योजना लागू करण्यात आली व त्यात व्याज आणि दंड माफ करण्यात आला; परंतु या अभय योजनेस रहिवाशांकडून फारसा प्रतिसाद मिळाला नाही. यामुळे विधिमंडळात त्यांनी या रकमेची मुद्दलदेखील रद्द करावी, अशी मागणी केली, त्यामुळे २०२३ च्या हिवाळी अधिवेशनात १९९८ पासूनचे व २०१८ पर्यंतचे वाढीव थकीत सेवाशुल्क रद्द केल्याचे धोषणा करण्यात आली.
जनता सर्वेक्षणात मुंबईत ९ वा क्रमांक
मुंबईतील आमदारांची विधानसभेतील एकंदर सर्व कामगिरी तसेच त्यांची मतदारसंघातील कामे ध्यानात घेऊन केलेल्या प्रजा सर्वेक्षणात कुडाळकर यांना मुंबईतील आमदारांमध्ये नववा क्रमांक देण्यात आला.
स्वदेशीच्या कामगारांची देणी
स्वदेशी मिल बंद होऊन सुमारे २२ वर्षाहून अधिक काळ उलटूनही कामगारांची देणी व त्यांना घरेही मिळाली नव्हती. हा विषय प्रलंबित राहिला होता. आमदार कुडाळकरांनी सर्व संघटनांच्या प्रतिनिधीना सोबत घेऊन समवयासाठी एक समिती स्थापन केली आणि व्यवस्थापनशी चर्चा सुरू केली. चर्चेला यश आले. सप्टेंबर २०२३ मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने मिल व्यवस्थापनाला २० कोटी रुपये जमा करण्याचा आदेश देऊन तीन हजार गिरणी कामगारांची देणी व हक्काची घरे मिळण्याचा मार्ग मोकळा केला.
इतर कार्याचा आढावा
- कुर्ला शिवसृष्टी येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह संपूर्ण स्वच्छता मोहिमेत सहभागी
- महापालिका, पोलिस व अन्य सरकारी अधिकाऱ्यांसह नागरिकांशी ‘थेट संवाद थेट समाधान’मोहिमेचे नियमितपणे आयोजन
- विभागात आगरी भवन तसेच मराठा भवनाची उभारणी
- ओबीसी समितीवर काम करताना ओबीसी समाज बांधवांच्या हितासाठी प्रयत्नशील
सांस्कृतिक उपक्रमास प्रोत्साहन
- कुर्ला फेस्टिव्हलसारख्या उपक्रमांमधून संस्कृती व परंपरा यांचा मेळ साधण्यासाठी आमदार श्री शरीरसौष्ठव स्पर्धा, मंगळागौर-पैठणी स्पर्धा, नृत्यस्पर्धा, श्रीराम गाथा, मराठी गाथा आदींचे आयोजन
- नवरात्रीत कुर्ल्याचा महागरबा केदारनाथचे आयोजन
- भव्य दहीकाला उत्सवाचे आयोजन
- दिमाखदार गणेशोत्सवाचे आयोजन
जिल्हाधिकारी भूमीसाठी विशेष प्रयत्न
कलेक्टर लँडवरील मूहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकासासाठी कुडाळकर यांनी मोठ्या प्रमाणात पाठपुरावा केला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. या आंदोलनानंतर शासनाने ८ मार्च २०११ रोजी ही जमीन फ्री होल्ड करण्याबाबतची अधिसूचना काढली आणि अभय योजना लागू केली, तीन वर्षाच्या कालावधीसाठी अधिमूल्याची रक्कम बाजारमूल्याच्या १० ते १५ टक्के आकारण्यात आली. रहिवाशांच्या मागणीनुसार या योजनेस मुदतवाढ मिळावी व अधिमूल्याची रक्कम आणखी कमी करण्यात दादी, अशी मागणी लक्षवेधी सूचनेद्वारे केली. हा प्रश्नही लवकरच सुटेल, असा विश्वास कुडाळकर यांना आहे