मातोश्री-२ चे बेकायदा बांधकाम पैसे देऊन नियमित केले गेले - नारायण राणे
X
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना जुहू येथील बंगल्यात अनधिकृत बांधकाम असल्याबाबत मुंबई महापालिकेने नोटीस बजवाली आहे. मुंबई महापालिकेच्या या नोटीशीमागे केवळ राजकीय हेतू असल्याचा आरोप नारायण राणे यांनी केला आहे. राणे यांनी मुंबईत शनिवारी पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेवर जोरदार टीका केली.
जुहू येथील अधीश बंगल्यात आपण १७ सप्टेंबर २००९ रोजी रहायला आलो. या बंगाल्याचे सर्व बांधकाम कायदेशीर आहे, असे राणेंनी यावेळी सांगितले. आपण या घरात रहायला येऊन १३ ते १४ वर्ष झाली आहेत, या बंगल्याचे आर्किटेक्ट जगभरातील प्रसिद्ध व्यक्ती आहेत. या इमारतीला ऑक्युपेशन सर्टिफिकेट, बिल्डिंग पूर्ण झाल्याचा सर्टिफिटेक, पालिकेनेच दिल्या होत्या., असेही राणेंनी यावेळी सांगितले. या बंगल्यता आपली पत्नी, दोन मुलं, सुना आणि त्यांचे दोन छोटे मुलं असे केवळ आठ लोक राहतो. त्यामुळे या घरात काही वाढवण्याची गरजच आम्हाला नाही, असे राणेंनी यावेळी सांगितले.
उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीची दुरुस्त केली आणि मातोश्री टू बांधली, यावर आम्ही काही प्रश्न उपस्थित केले का, असा सवाल राणेंनी विचारला. भाजपा-शिवसेनेची सत्ता असताना मातोश्री २ चं बेकायदाबांधकाम पैसे देऊन नियमित केले गेले, पण आम्ही काही बोललो नाही, असे राणे यांनी यावेळी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे, पण आता त्यांच्याच महाराष्ट्रात अशी कट-कारस्थानं करणाऱ्या लोकांच्या हातात सत्ता आहे, त्यांची सत्ता राहू देऊ नका, अशी टीका राणे यांनी यावेळी केली.