घरगुती गॅस, इंधन दरवाढ व महागाई विरोधात राष्ट्रवादीचं आंदोलन
X
केंद्रसरकारने वाढवलेल्या घरगुती गॅस, इंधन दरवाढ व महागाई विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस राज्यभर आंदोलन करत आहे.
तुमचे सिलेंडर आमच्या घराच्या सुखसमृद्धीत आणि शांतीमध्ये आग लावत असेल तर यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस आंदोलन छेडल्याशिवाय गप्प बसणार नाही असा इशारा राष्ट्रवादीने दिला आहे.
सामान्य जनतेचा आक्रोश केंद्र व राज्यसरकारसमोर मांडला पाहिजे. त्यामुळे कोरोनाचे नियम पाळून राज्यात आंदोलन करण्याचे आवाहन प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना केले आहे.
गृहिणींच्या बजेटमध्ये फार मोठं संकट केंद्रसरकारने निर्माण केले आहे. अचानकपणे सिलेंडरचे दर २५ रुपयांनी वाढवले. २० दिवसाला ८०९ रुपये तर महिन्याला दीड हजार रुपये सिलेंडरमागे सर्वसामान्य जनतेला द्यावे लागणार आहेत.
त्यामुळे जनतेला मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागत आहे. यासंदर्भात जनतेच्या नक्की काय भावना आहेत... पाहा