Home > Max Political > ३० खासदारांच्या संसदीय समितीची सिद्धार्थ महाविद्यालयाला भेट

३० खासदारांच्या संसदीय समितीची सिद्धार्थ महाविद्यालयाला भेट

३० खासदारांच्या संसदीय समितीची सिद्धार्थ महाविद्यालयाला भेट
X

३० खासदारांच्या संसदीय समितीची सिद्धार्थ महाविद्यालयाला भेट

अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींच्या कल्याणावरील संसदीय समितीने, ग्रंथालयाच्या पायाभूत सुविधांची देखरेख करण्यासाठी आणि पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या विश्वस्तांशी बैठक घेण्यासाठी आज मुंबईच्या सिद्धार्थ कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाला भेट दिली.

संसदीय समितीमध्ये लोकसभेच्या सर्वपक्षीय २० सदस्यांचा आणि राज्यसभेच्या १० सदस्यांचा समावेश आहे. समितीचे अध्यक्ष प्रा. डॉ. किरीट सोलंकी यांच्या नेतृत्वाखाली भारत सरकारच्या विविध विभागांचे सहसचिव, अवर सचिव आणि संचालक आणि विद्यापीठ अनुदान आयोग यांच्या समवेत समितीने भेट दिली.



हा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी, सिद्धार्थ कॉलेजला मुंबई विद्यापीठ, उच्च शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाचे मार्गदर्शन लाभले आहे. खासदार प्रा. डॉ. किरीट सोळंकी यांनी १६ ऑगस्ट २०२३ रोजी महाविद्यालयाच्या ग्रंथालयाला पहिली भेट दिली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पुस्तके, त्यांचे हस्तलिखीते, स्वाक्षरी केलेली व मुद्दे काढलेली पुस्तके, भारताची राज्यघटना तयार करण्यासाठीची पुस्तके पाहून ते अत्यंत प्रभावित आणि संवेदनशील झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा वारसा जतन आणि संवर्धनाची जबाबदारी पार पाडताना त्यांना आनंद झाला आणि त्यांनी इतर सर्व समिती सदस्यांना केलेल्या आवाहनाचा परिणाम या भेटीमध्ये झाला.

संसदीय समिती सदस्यांचे स्वागत पीपल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर आणि मुंबईच्या सिद्धार्थ कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक सुनतकरी यांनी केले. सर्व सदस्यांनी गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व बुद्ध वंदना करून आदरांजली वाहिली. त्यानंतर सर्व सदस्यांनी महाविद्यालयाच्या ग्रंथालयाला भेट दिली आणि त्यांनी ग्रंथालयात उपस्थित असलेल्या १,४०,००,००० पुस्तकांपैकी या उद्देशासाठी निवडलेल्या दुर्मिळ १०,००० पुस्तकांचे जतन, संवर्धन आणि डिजिटलायझेशनमधील प्रगती पाहिली. जतन आणि संवर्धन क्षेत्रातील तज्ज्ञ डॉ. अमोल दिवकर, ग्रंथपाल चैताली शिंदे, माजी ग्रंथपाल श्रीकांत तळवटकर यांनी समितीला या जतन आणि संवर्धनाबाबत सर्व माहिती दिली आहे. यासर्व प्रयत्नांचा संसदीय सदस्यांना आनंद झाला.

ग्रंथालयाला सविस्तर भेट दिल्यानंतर, सर्व संसद सदस्यांनी पीपल एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त, महाविद्यालयाचे प्राचार्य आणि कर्मचारी यांची खोली क्रमांक 34 मध्ये बैठक घेतली जिथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत. कार्यक्रमाची सुरुवात उपप्राचार्य रमेश झाडे यांच्या स्वागत सूचनेने आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदेशाने झाली. तो संदेश असा की “सामाजिक गुलामगिरी तोडण्याचे शिक्षण हेच योग्य हत्यार आहे आणि ते शिक्षण आहे; जे दबलेल्या, शोषित जनतेला वर येण्यासाठी प्रबोधन करते आणि सामाजिक दर्जा, आर्थिक आणि राजकीय स्वातंत्र्य मिळवून देते."



या आवाजी स्वागतानंतर मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.डॉ.रवींद्र कुलकर्णी, कुलसचिव प्रा.डॉ. भिरूड, महाविद्यालयाचे प्राचार्य व पीपल एज्युकेशन सोसायटीच्या विश्वस्तांनी सर्व संसद सदस्य व विविध विभागातील शासकीय अधिकाऱ्यांचा सत्कार केला. स्वागतानंतर, मुंबईच्या सिद्धार्थ कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. अशोक सुनतकरी यांनी महाविद्यालयाचा इतिहास आणि पीपल्स एज्युकेशन सोसायटीची माहिती देण्यासाठी सादरीकरण केले. त्यांनी सर्व प्रकारच्या मदतीसाठी आवाहन केले.

पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी त्यांचे आजोबा आणि भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र कार्यस्थळाला भेट दिल्याबद्दल सर्व संसद सदस्यांचे आभार मानले. पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या पुनर्बांधणीत आणि प्रगतीत आपले योगदान देण्यासाठी सभेला उपस्थित सर्व मान्यवरांनी सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी याप्रसंगी केले.

एससी/एसटी कल्याण संसदीय समितीचे अध्यक्ष प्रा.डॉ.किरीट सोळंकी यांनी बाबासाहेबांच्या भूमीला आदरांजली वाहिली, त्यांच्या ऐतिहासिक आणि क्रांतिकारी कार्याला त्यांच्या भाषणातून व लिखाणातून अभिवादन केले. संविधानाच्या मूल्यांसाठी त्यांचे कर्तव्य कबूल करण्यास विसरले नाही. जगाच्या पटलावर भारताला एक उदयोन्मुख शक्ती बनवले. त्यांनी भारतातील सर्व सामान्य जनतेच्या कल्याणासाठी सिद्धार्थ कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय तसेच पीपल एज्युकेशन सोसायटीच्या पुनर्बांधणीसाठी सर्व प्रकारची मदत आणि सहकार्य देण्याचे स्पष्ट संकेत आणि तयारी दर्शविली.

संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपप्राचार्य रमेश झाडे यांनी केले तर आभार डॉ. विशाल नांगरे यांनी मानले. प्राचार्य प्रा.डॉ.सुनतकरी यांच्या मार्गदर्शनाखाली एनएसएस कार्यक्रम समन्वयक डॉ.सुनीता गायकवाड, एनएसएस स्वयंसेवक, एनसीसी कॅडेट्स यांनी परिश्रम घेतले. पीपल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर, विश्वस्त ॲड.संघराज रूपवते व सचिव कॅप्टन संजीव बोधनकर यांनी पूर्ण सहकार्य व मार्गदर्शन केले.

Updated : 28 Aug 2023 8:54 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top