आमची लढाई शिवसेना विरुद्ध शिवसेना किंवा राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी नाही - सुप्रिया सुळे
X
राष्ट्रवादी कुणाची याबाबत निवडणूक आयोगापुढे सुनावणी सुरू आहे. तर दुसऱ्या बाजूला सुप्रिया सुळे यांनी अत्यंत महत्त्वाचं विधान केलं आहे.
अजित पवार यांनी सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतल्यानंतर शरद पवार चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्यातच अजित पवार गटानेही शरद पवार गटावर हल्लाबोल करायला सुरुवात केली आहे. हे सगळं सुरू असतानाच सुप्रिया सुळे यांनी मोठं वक्तव्य केलंय.
सुप्रिया सुळे म्हणाल्या, आमची लढाई ही शिवसेना विरुद्ध शिवसेना किंवा राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी नाही. तर आमची लढाई ही भाजपशी आहे. ज्यांनी महाराष्ट्रात फोडा फोडीचे राजकारण केले. ज्यांनी महाराष्ट्रातील उद्योग दुसऱ्या राज्यात नेले. ज्यांनी महाराष्ट्रातील नेत्यांचे खच्चिकरण केले. ज्यामध्ये सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीस यांचाही उल्लेख केला.
सुप्रिया सुळे म्हणाल्या, देवेंद्र फडणवीस यांनी आमच्याविरोधात प्रचार केला. आमच्यावर आरोप केले आणि १०५ आमदार निवडून आणले. पण त्यांना दुय्यम वागणूक दिली. त्यानंतर त्यांचे आणखी खच्चीकरण करून फडणवीस यांना अर्ध उपमुख्यमंत्री पद दिलं. त्यामुळं आमची लढाई ही भ्रष्ट जनता पार्टी यांच्याही आहे, असं म्हणत भाजप वर हल्लाबोल केला.