कोण आहे बाळासाहेबांच्या विचाराचे वारसदार राज की उद्धव वातावरण तापले?
X
गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या कामाला आज सुरुवात होणार आहे. मुंबईत आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते स्मारकाचा भूमिपूजन सोहळा पार पडणार आहे.
या सोहळ्याच्या आमंत्रित व्यक्तींच्या यादीवरून राजकारण तापलं आहे. या सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात या महाविकास आघाडीच्याच नेत्यांचीच नावं आहेत. राज ठाकरे यांचं नाव नाही. यावरून मनसे नेते संदिप देशपांडे यांनी ट्विट केलं आहे. या ट्विटने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 'स्वर्गीय बाळासाहेबांचे विचार खऱ्या अर्थानं पुढं नेण्याचं काम हे राजसाहेबच करत आहेत हीच मराठी माणसाची भावना आहे. आणि तीच महत्वाची आहे. बाकी भूमिपूजन कोण करतंय ते फारसं महत्त्वाचं नाही,'
संदीप देशपांडे यांच्या या ट्विटने पुन्हा एकदा बाळासाहेबांच्या विचाराच्या वारसदाराचा मुद्दा चर्चेत आला आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक जुन्या महापौर निवासाच्या ठिकाणी होणार आहे. मुंबईतील वास्तुविशारद आभा लांबा यांनी या स्मारकाचा आराखडा तयार केला आहे. या स्मारकाचा पहिला टप्पा १४ महिन्यांमध्ये पूर्ण केला जाणार आहे.
स्वर्गीय मा.बाळासाहेबांचे विचार खऱ्या अर्थाने पुढे नेण्याचं काम हे राजसाहेबच करत आहेत हीच मराठी माणसाची भावना आहे. आणि तीच महत्वाची. बाकी भूमिपूजन कोण करतंय महत्वाचं नाही.
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) March 31, 2021