Home > Max Political > राष्ट्रवादीच्या आणखी एका मंत्र्याच्या चौकशीचे आदेश, किरीट सोमय्या यांचा दावा

राष्ट्रवादीच्या आणखी एका मंत्र्याच्या चौकशीचे आदेश, किरीट सोमय्या यांचा दावा

राष्ट्रवादीच्या आणखी एका मंत्र्याच्या चौकशीचे आदेश, किरीट सोमय्या यांचा दावा
X

महाविकास आघाडीमधील एकेका मंत्र्यांविरोधात आरोप करुन केंद्रीय यंत्रणांचा ससेमिरा मागे लावणारे किरीट सोमय्या यांनी आता आणखी एक दावा केला आहे. दिल्लीमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, संजय राऊत यांच्यासह राष्ट्रवादीवर जोरदार टीका केली आहे. मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष आण शिवसेनेचे नेते यशवंत जाधव यांच्यावर इनकम टॅक्स विभागाने कारवाई केली होती, आता यशवंत जाधव यांच्या विरोधात इतर केंद्रीय एजन्सींनी पण चौकशी सुरू केली आहे, अशी माहिती सोमय्या यांनी दिली आहे.

एकीकडे नवाब मलिक यांच्या अटक करण्यात आली असताना आता सोमय्या यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री हसन मुश्रीफ यांच्याबद्दल आणखी एक दावा केला आहे. मंत्री हसन मुश्रीफ यांच्या साखर कारखान्याबाबत तपास करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. तसेच राज्याला लवकरच घोटाळा मुक्त करणार असल्याचे त्यांनी सांगितले. हसन मुश्रीफ यांची चौकशी इन्कम टॅक्स विभाग करत आहे. मुश्रीफ यांचा विषय SFIO कडे गेला आहे. तसेच मुश्रीफ यांचा 158 कोटींचा बेनामी व्यवहार बाहेर येणार आहे, असा दावाही त्यांनी केला.

याच पत्रकार परिषदेत सोमय्या यांनी ठाकरेंवर टीका केली. ५ राज्यांच्या निवडणूक निकालांवर बोलताना सोमय्या यांनी उद्धव ठाकरे आणि त्यांच्या माफिया सेनेची इज्जत गेली आहे, गोवा आणि उत्तर प्रदेशच्या जनतेने त्यांना जागा दाखवली असा टोलाही लगावला. संजय राऊत यांच्यामार्फत स्टंट करून काही साध्य होत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.


Updated : 11 March 2022 2:11 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top