महाविकास आघाडी सरकारमधील OBC नेते काका-पुतण्याच्या ताटाखालचे मांजर - पडळकर
X
सांगली - महाविकास आघाडी सरकारमधील ओबीसी नेते हे काका पुतण्याच्या ताटाखालचे मांजर झाले आहेत, या शब्दात भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी टीका केला आहे. सरकारमधील ओबीसी मंत्र्यांच्या शब्दाला कवडीची किंमत राहिलेली नाही, अशीही टीका त्यांनी केली आहे. ते सांगलीतील झरे येथे बोलत होते.
राज्यात होणाऱ्या जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्ये सर्व जागांवर ओबीसी उमेदवार उभे केले जातील असे, भाजपने जाहीर केले आहे. पण जोपर्यंत ओबीसी राजकीय आरक्षण पुनर्प्रस्थापित होत नाही. तोपर्यंत महाराष्ट्रामध्ये निवडणुका होणार असा दावा मंत्र्यांनी केला होता. पण दुसऱ्याच दिवशी या निवडणूका जाहीर झाल्या. त्यामुळे या ओबीसी नेत्यांच्या शब्दाला किंमत नाही, अशी टीका त्यांनी केली आहे. ओबीसी नेते फक्त मलिदा खाण्यासाठी सत्तेमध्ये आहेत का, त्यांनी आत्मसन्मान विकला आहे का? या प्रश्नांची उत्तरे द्यावीत अशीही मागणी त्यांनी केली आह. येत्या 26 तारखेला ओबीसी समाज आपली ताकत दाखवत या सरकारला जागा दाखवणार असल्याचेही पडळकर यांनी सांगितले..