Home > Max Political > आता पुण्यातील दर्गा मनसेच्या टार्गेटवर

आता पुण्यातील दर्गा मनसेच्या टार्गेटवर

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पाडवा सभेत माहीमच्या समुद्रात दुसरं हाजी अली उभारलं जातंय का ? असा सवाल उपस्थितीत केला. आणि मुंबई इथल्या माहीमच्या खाडीतील अनाधिकृत दर्ग्याबाबत आवाज उठवला. या सभे नंतर मनसे नेते आणि कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळत आहे.

आता पुण्यातील दर्गा मनसेच्या टार्गेटवर
X

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पाडवा सभेत माहीमच्या समुद्रात दुसरं हाजी अली उभारलं जातंय का ? असा सवाल उपस्थितीत केला. आणि मुंबई इथल्या माहीमच्या खाडीतील अनाधिकृत दर्ग्याबाबत आवाज उठवला. या सभे नंतर मनसे नेते आणि कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळत आहे. अनधिकृत मशिदीवर कारवाई करण्याची मागणी मनसेकडून करण्यात आली असून सध्या माहीम दर्ग्या नंतर सांगलीत कारवाई करण्यात आली आणि आता

पुणे देखील मनसेच्या रडारवर आहे.

पुण्यात कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. यादरम्यान आता मुंब्रा परिसरातील मशीद मनसेच्या टार्गेटवर आली आहे आणि त्या पद्धतीने त्या प्रकरणावर कारवाई करण्याची मागणी मनसेकडून करण्यात आली आहे. जर कारवाई करण्यात नाही आली तर मनसे त्याच्या शेजारी मंदिर उभारू असा आक्रमक इशारा मनसे ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या कडून देण्यात आला आहे.

पाडवा सभेतील राज ठाकरेंचं दर्ग्याबाबत वक्तव्य

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी माहीमच्या खाडीतील अनाधिकृत दर्ग्याबाबत आवाज उठवला. हा दर्गा अनाधिकृत आहे. त्यावर कारवाई करा. नाही तर आम्ही तिथे गणपतीचं मंदिर बांधू असा इशारा देतानाच राज ठाकरे यांनी प्रशासनाला कारवाईसाठी एक महिन्याची मुदत दिली. मी हि क्लिप दाखवण्यापूर्वी माझा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल चहल या सगळ्यांनाच विनंती आहे की, कारवाई होत नसेल तर महिन्याभराने काय होईल ते मी सांगतो. माहीमच्या समुद्रात दुसरं हाजी अली उभारलं जातंय लक्ष आहे का ? समुद्रात मकदुम बाबा दर्गा उभा केला आहे. माहीम पोलीस स्टेशन तिथे जवळ आहे, त्यांचंही लक्ष नाही. महापालिकेचे लोक फिरत असतात त्यांनीही पाहिलं नाही. हे नवीन हाजी अली तयार करण्याचा प्रयत्न होतो आहे. आता प्रशासनाला, मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना, पोलीस आयुक्तांना, महापालिका आयुक्तांना मी आजच सांगतो की, महिनाभरात कारवाई झाली नाही तर त्याच्या बाजूला सर्वात मोठं गणपतीचं मंदिर उभं केल्याशिवाय आम्ही राहणार नाही मग काय व्हायचं ते होऊ देत, असा इशाराच राज ठाकरेंनी यावेळी दिला.

Updated : 25 March 2023 7:16 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top