Home > Max Political > ममता बॅनर्जी 'कॅप्टन', बिगरभाजप मुख्यमंत्र्यांची मुंबईत परिषद

ममता बॅनर्जी 'कॅप्टन', बिगरभाजप मुख्यमंत्र्यांची मुंबईत परिषद

चार राज्यातील पोटनिवडणूकीतील विजयानंतर विरोधी पक्षांच्या आत्मविश्वासाला उभारी मिळाली आहे. त्यातच देशात भाजपविरोधकांची वज्रमुठ बांधण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यापार्श्वभुमीवर ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्या नेतृत्वात मुंबईत बिगरभाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची परिषद आयोजित करण्यात आली आहे.

ममता बॅनर्जी कॅप्टन, बिगरभाजप मुख्यमंत्र्यांची मुंबईत परिषद
X

देशात निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी बिगर भाजप (Non BJP CM) शासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची परिषद मुंबईत (CM Council in Mumbai) आयोजित करण्यात येणार आहे. तर या परिषदेचे नेतृत्व पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी करणार आहेत. त्याबाबत त्यांनी बिगर भाजप शासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहीले आहे, अशी माहिती संजय राऊत यांनी रविवारी माध्यमांशी बोलताना दिली.

गेल्या काही दिवसांपुर्वी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यासह शरद पवार यांचीही भेट घेतली होती. त्यानंतर देशात भाजप विरोधकांची मोट बांधण्याचा प्रयत्न सुरू झाल्याची चर्चा होती. त्यापाठोपाठ आता ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वात बिगरभाजप शासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची परिषद मुंबईत पार पडणार आहे. तर याबाबत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी शरद पवार यांच्याशी चर्चा केली असल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली. (Non BJP CM Alliance in Mumbai)

संजय राऊत (Sanjay Raut) यांनी यावेळी सांगितले की, ममता बॅनर्जी यांनी या पत्रात महागाई, बेरोजगारी, केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर आणि निर्माण केली जात असलेली धार्मिक तेढ आदी मुद्द्यांवर या परिषदेत चर्चा होणार आहे.

याबरोबरच देशातील 13 प्रमुख विरोधी पक्षांच्या नेत्यांनी देशात सध्या निर्माण झालेल्या परिस्थितीवर तसेच जातीय हिंसाचाराच्या घटना आणि द्वेषपुर्ण भाषणे यांवर नाराजी व्यक्त करत संयुक्त निवेदनाद्वारे पंतप्रधानांकडे चिंता व्यक्त केली. तसेच या पक्षांच्या नेत्यांनी लोकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.

संयुक्त निवेदनावर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन, झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते आणि झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्यासह 13 पक्षांच्या नेत्यांच्या सह्या आहेत.

Updated : 18 April 2022 10:30 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top