पराभवानंतर काँग्रेसचे चिंतन, बैठकीत काय घडले?
X
पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमधील पराभवानंतर काँग्रेस वर्कींग कमिटीची बैठक रविवारी पार पडली. पक्षाचा या निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर काँग्रेसच्या काही नेत्यांनी पक्षाचे नेतृत्व गांधी परिवाराच्या व्यक्तीकडे न देता दुसऱ्या व्यक्तीकडे द्यावे, अशी भूमिका मांडली होती. पण या बैठकीत तूर्तास सोनिया गांधी यांच्याकडेच पक्षाचे नेतृत्व द्यावे असे ठरले. गुजरातमध्ये होणाऱ्या आगामी निवडणुका पार पडेपर्यंत नेतृत्वात कोणताही बदल करण्यात येणार नाही, असा निर्णय घेण्यात आल्याची माहिती माहिती सुत्रांनी दिली आहे.
CWC ने ये भी निर्णय लिया है कि संसद के इस सत्र के तुरंत बाद एक व्यापक चिंतन शिविर बुलाया जाएगा, जहां भविष्य की रणनीति पर व्यापक चर्चा होगी और रोडमैप निर्धारित होगा।
— Congress (@INCIndia) March 13, 2022
इसके लिए इसी माह में CWC की एक और बैठक बुलाई जाएगी : श्री @rssurjewala
याच बैठकीत राहुल गांधी यांनी आता सक्रीय झाले पाहिजे असा सल्ला पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी दिला. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या काळात काँग्रेस देश पातळीवर चिंतन शिबिर घेणार असून या बैठकीत पक्ष मजबूती संदर्भात निर्णय घेतला जाणार आहे. राहुल गांधी यांनी आगामी काळात पक्ष मजबूत होण्यासाठी सक्रीय व्हावं, अशी भूमिका काही नेत्यांनी मांडली. पण या बैठकीत कुणाच्याही राजीनाम्याबाबत चर्चा झाली नाही, अशी माहिती काँग्रेस मधील एका ज्येष्ठ नेत्याने दिली आहे.
CWC का वक्तव्य:
— Congress (@INCIndia) March 13, 2022
कांग्रेस पार्टी ने सर्वसम्मति से श्रीमती सोनिया गांधी जी के नेतृत्व में अपने विश्वास की पुनः पुष्टि की और कांग्रेस अध्यक्षा से अनुरोध किया कि वो आगे बढ़ पार्टी का नेतृत्व और मजबूती से करें और आवश्यक एवं व्यापक बदलाव करें : श्री @rssurjewala
पाच राज्यांमधील निवडणुकांमध्ये राहुल आणि प्रियंका गांधी यांनी संपूर्ण ताकद पणाला लावून प्रचार केला होता. पण मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यात त्यांना यश मिळाले नाही. त्यामुळे सोनिया गांधी, राहुल आणि प्रियंका गांधी हे या बैठकीत आपापले राजीनामे सादर करतील अशी चर्चा होती. पण या बैठकीत कुणाच्याही राजीनाम्य़ांबाबत चर्चा झाली नाही.