गडकरी ठाकरे भेट, 'हिच ती वेळ' आहे का?
गडकरी ठाकरे भेट, ‘हिच ती वेळ’ आहे का?
X
भाजपने मध्यप्रदेश, कर्नाटक या राज्यात हातातून सत्ता गेलेली असताना या राज्यात साम दाम दंड भेदचा वापर करत पुन्हा एकदा सत्ता मिळवली. बिहार मध्ये नितिश कुमार यांना पद देऊन सत्ता आपल्या ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न केला.
मात्र, महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांचं सरकार पाडण्याच्या फक्त वावड्या उठल्या प्रत्यक्ष प्रयत्न मात्र, झाला नाही. त्यातच महाराष्ट्रात ठाकरे सरकार सत्तेत आल्यापासून ज्या पद्धतीने नितीन गडकरी आले. उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा केली. त्यापद्धतीने भाजपकडून मोदी अथवा अमित शहा यांच्या पैकी कोणीही आलेलं नाही.
त्यातच अलिकडे शिवसेनेच्या अनेक नेत्यांना इडीची नोटीस आली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर गडकरी यांची आजची भेट फार महत्त्वाची आहे. विशेष म्हणजे गडकरी यांनी आजच्या दिवसाची सुरुवात शिवसेना नेते आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना दंडवत घालत केली. त्यांना वाकून केलेल्या नमस्काराचा फोटो गडकरी यांच्या ट्विटर अकांउंट वरुन शेअरही करण्यात आला. हा भाजपचा शिवसेनेशी जवळीक साधण्याचा प्रयत्न आहे का?
भाजपवर नाराज असलेल्या शिवसेनेला शांत करण्यासाठी गडकरी यांची ही भेट होती का?
कारण...
एकीकडे गडकरी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असताना राज्यात घडणाऱ्या राजकीय घडामोडी काय संकेत देतात...?
शरद पवार यांनी त्यांच्या सर्व मंत्र्यांची बैठक बोलावली. इकडे नामांतराच्या मुद्यावरुन कॉंग्रेस आक्रमक झालेली आहे. अजुनही राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या अकांउंटवरुन संभाजीनगर असाच वारंवार उल्लेख करण्यात येत आहे. त्यामुळे कॉंग्रेसची आक्रमकता आणि शिवसेनेचं कॉंग्रेसला न जुमानं हे कसले संकेत आहेत. औरंगाद शहराचा नामांतराचा मुद्दा शिवसेना जाणून बुजून तापवू पाहातंय का? कावळ्याला उडायला आणि फांदी मोडयला 'हीच ती वेळ आहे का?'
बिहार निवडणूकीनंतर राज्यात भाजप चं मिशन लोटस सुरू करण्यात येईल असं सांगण्यात आलं होतं. गडकरी आणि ठाकरे यांची ही भेट या मिशनचा पुढील भाग तर नाही ना? असा सवाल या निमित्ताने उपस्थित होतो.