Home > Max Political > नितेश राणेंना दोन दिवसांची पोलिस कोठडी

नितेश राणेंना दोन दिवसांची पोलिस कोठडी

शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणात संशयित असलेल्या भाजपा आमदार नितेश राणे यांचा जामिन अर्ज जिल्हा न्यायालयाने फेटाळला होता. त्यानंतर त्यांनी हायकोर्टात अर्ज केला होता. पण आता हायकोर्टात केलेला अर्ज मागे घेतला आहे.अर्ज मागे घेऊन सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयात शरण आले आहेत.न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतरही जामीन अर्जावरील सुनावणीदरम्यान 4 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

नितेश राणेंना दोन दिवसांची पोलिस कोठडी
X

आमदार नितेश राणे यांना पोलिसांकडून मात्र दहा दिवसाची पोलीस कोठडीची मागणी केली होती. मात्र न्यायालयात दोन्ही बाजूने युक्तिवाद झाल्यानंतर न्यायालयाने दोन दिवसाची पोलीस कोठडी दिल्याची माहिती नितेश राणे यांचे वकील संग्राम देसाई यांनी दिली आहे.नितेश राणेंचा अटक पूर्व जामीन अर्ज न्यायालयानं फेटाळला होता. नितेश राणे यांची याचिका फेटाळताना सुप्रीम कोर्टाने त्यांना अटकेपासून 10 दिवसांचे संरक्षण दिले होते. नितेश राणे यांनी 10 दिवसांत सिंधुदुर्ग सत्र न्यायालयापुढे शरण जाण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले होते. नियमित जामीनासाठी राणे यांनी सत्र न्यायालयात अर्ज करावा असेही निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले होते. न्यायालयाने नितेश राणे यांचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर जामिनासाठी नितेश राणे उच्च न्यायालयात अर्ज करणार होते. परंतु, अचानक निर्णय बदलत ते जिल्हा सत्र न्यायालयाला शरण आले. त्यानंतर त्यांना न्यायालीन कोठडी सुनवण्यात आली.

याच दरम्यान काल जामिन अर्ज फेटाळल्या नंतर न्यायालयाबाहेरच राणे समर्थांमध्ये बाचाबाची झाली.निलेश राणे आणि पोलिंसासमोर आक्रमक झाले.याप्रकरणी निलेश राणेंविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.पोलिसांशी अर्वाच्च भाषेत हुज्जत घातल्याप्रकरणी ओरोस पोलीस ठाण्यात रात्री उशीरा गुन्हा दाखल झाला आहे.

Updated : 2 Feb 2022 7:02 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top