Home > Max Political > भीमा कोरेगाव:आनंद तेलतुंबडे यांना जामीन नाहीच..

भीमा कोरेगाव:आनंद तेलतुंबडे यांना जामीन नाहीच..

भीमा कोरेगाव:आनंद तेलतुंबडे यांना जामीन नाहीच..
X

फादर स्टँन स्वामी (father stamy)यांच्या मृत्युनंतर भीमा कोरेगाव(bhima korgaon) हिंसाचार प्रकरणी अटकेत असलेल्या विचारवंतांचा मुद्दा समोर आलेला असतानाच स्पेशल NIA कोर्टाने आज विचारवंत आनंद तेलतुंबडे यांचा जामीन अर्ज पुन्हा एकदा नाकारला आहे.

NIA ने कोर्टात सादर केलेलं एफआयआर आणि चार्जशीट त्यांच्यावरील आरोप सिद्ध करण्यास पुरेसे नाही म्हणून जामिनावर मुक्तता करावी अशी मागणी तेलतुंबडे यांच्या वकिलाने स्पेशल NIA कोर्टात केली होती.

तळोजा कारागृहात अटकेत असलेले आनंद तेलतुंबडे यांनी मी गेले काही महिने सातत्याने जामिनासाठी NIA कोर्टात अर्ज केला आहे.

" जातीयवादी शक्तींना माझं यश सहन झालं नाही. भीमा कोरेगाव हे निमित्त साधून मला जाणीवपूर्वक गोवण्यात आलं, असा युक्तिवाद आज तेलतुंबडे यांच्या वकिलांनी कोर्टात केला होता."

NIA हे वकील प्रकाश शेट्टी यांनी आनंद तेलतुंबडे हे सीपीआय (माओइस्ट) या बंदी घातलेल्या संघटनेचे कार्यकर्ते असल्याचं कोर्टात सांगितलं. एल्गार परिषदेच्या निमित्ताने तेलतुंबडे हे पुण्यात उपस्थित होते. कबीर कला मंचच्या माध्यमातून या परिषदेचे आयोजन केले होते. तेलतुंबडे यांचा मोबाईल लोकेशन वरुन हे सिद्ध होते की ते घटना घडली त्यावेळेस शनिवार वाडा परिसरात उपस्थित होते.

हायकोर्टातील निकालाचा संदर्भ देत शेट्टी यांनी कोर्टात सादर केलेले पुरावे पुरेसे असल्याचे सांगितले.

सीपीआय (माओइस्ट) या बंदी घातलेल्या संस्थे हा अजेंडा राबवण्यास त्यांचे बंधू मिलिंद तेलतुंबडे यांच्यासोबत आनंद तेलतुंबडे सक्रिय सहभागी होते असे शेट्टी यांनी सांगितले.

तेलतुंबडे यांचे वकील संदीप पासबोला यांनी सर्व आरोप फेटाळत सीपीआय (माओइस्ट) या संस्थेशी तेलतुंबडे यांचा कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट केलं. संस्थेच्या कार्यक्रमाला भाषण देणे म्हणजे संस्थेचा सदस्य होत नाही असंही त्यांनी सांगितलं.

भीमा कोरेगाव एल्गार परिषदेच्या आयोजनामध्ये तेलतुंबडे यांचा सहभाग नव्हता त्यासंबंधीचे कुठलेही पुरावे उपलब्ध नाहीत. हरी बाबु आणि स्टँड स्वामी या दोन आरोपींसोबत इमेल कम्युनिकेशन देखील NIA सोयीने वापरत असल्याचा प्रतिवाद त्यांनी केला. दोन्ही बाजू व ऐकून घेतल्यानंतर स्पेशल जज डीई कोठाळकर यांनी जामीन अर्ज राखून ठेवला आहे.

Updated : 13 July 2021 8:55 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top