Home > Max Political > "बायको जात चोरते आणि नवरा राजदंड… हे तर बंटी बबली निघाले"

"बायको जात चोरते आणि नवरा राजदंड… हे तर बंटी बबली निघाले"

रुपाली चाकणकर यांचा हा वार कोणावर? वाचा नक्की काय आहे प्रकरण?

बायको जात चोरते आणि नवरा राजदंड… हे तर बंटी बबली निघाले
X

दोन दिवसीय पावसाळी अधिवेशनाचे सूप वाजले. अधिवेशनाचा शेवटचा दिवस वादळी ठरला. एकीकडे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिविधानसभा भरवत राज्यसरकारवर टीका केली तर दुसरीकडे अपक्ष आमदार रवी राणा यांनी तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी शेतकरी प्रश्नाबाबत थेट निवेदन देण्याचा प्रयत्न केला.

मात्र, तालिकाध्यक्ष भास्कर जाधव यांनी नियमांप्रमाणे असे निवेदन घेता येणार नाही. असं सांगितले. त्यानंतर राणा यांनी हे निवेदन टेबलवर फेकून दिले. आणि तालिकाध्यक्षांसमोरील राजदंड पळवला. त्यानंतर भास्कर जाधव यांनी मार्शल्संना आदेश देऊन राणा यांना बाहेर काढले.

यावरुनच राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी रवी राणा आणि त्यांच्या पत्नी खासदार नवनीत राणा यांच्यावर निशाणा साधला आहे."बायको जात चोरते आणि नवरा राजदंड… हे तर बंटी बबली निघाले"





अशा शब्दात निशाणा साधला आहे. खासदार नवनीत राणा यांचं जात प्रमाणपत्र मुंबई उच्च न्यायालयाने अवैध ठरवलेले आहे. यावरुनच चाकणकर यांनी ही जहरी टीका केली आहे.

Updated : 7 July 2021 4:18 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top