Home > Max Political > फडणवीस-परमबीर सिंह यांच्या बैठकीनंतरच आरोप झाले: शरद पवार

फडणवीस-परमबीर सिंह यांच्या बैठकीनंतरच आरोप झाले: शरद पवार

विरोधी पक्षनेते आणि माजी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत आल्यानंतरच आरोप झाल्या मला माहीती आहे.सचिन वाझे यांना सेवेत घेण्याचा निर्णय मुख्यमंत्री किंवा गृहमंत्र्यांनी घेतला नाही तो निर्णय मुंबईचे पोलिस आयुक्त म्हणून परमबीर सिंग यांनी घेतला होता, असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज दिल्लीतील पत्रकार परीषदेत सांगितले.

फडणवीस-परमबीर सिंह यांच्या बैठकीनंतरच आरोप झाले: शरद पवार
X

परमबीर सिंग मला भेटले होते माझी बदली होते हा माझ्यावर अन्याय आहे असे त्यांनी मला सांगितलं होतं असंही शरद पवार म्हणाले. देवेद्र फडणवीस दिल्लीत आल्यानंतर हे पत्र समोर आलं आहे. त्या पत्रावर परमबीर सिंग यांची स्वाक्षरी नाही. त्यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेले आरोप गंभीर आहेत, असं पवार म्हणाले.

परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्राविषयी बोलताना शरद पवार म्हणाले,"परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेले आरोप गंभीर आहेत. या प्रकरणात गृहमंत्र्यांचं म्हणणं ऐकून घेतलं जाईल. परमबीर सिंग मलाही भेटले होते. पण, त्यांनी फक्त त्यांच्या बदलीबद्दल म्हणणं मांडलं होतं.

त्याचबरोबर माझ्या खात्यात राजकीय हस्तक्षेप होत असल्याचं म्हटलं होतं. त्यापलीकडे त्यांनीही मला काहीही सांगितलं नाही. पत्रकार परिषदेपूर्वीच माझं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणं झालं आहे. देशमुख यांच्याबद्दलचा निर्णय सर्वांशी बोलून घेतला जाईल. यासंदर्भातील सर्व अधिकार मुख्यमंत्र्यांकडे आहेत. त्यांनी योग्य ती चौकशी करून निर्णय घ्यावा. उद्या मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन चर्चा करणार आहे," असं शरद पवार यांनी सांगितलं.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी बदलीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवत राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. या प्रकरणाचे देशात आणि राज्यात पडसाद उमटत असून, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यावर काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष होतं. शेवटी शरद पवारांनी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत या मुद्द्यावर भाष्य करत भूमिका मांडली.

सरकार पाडण्याचे प्रयत्न होतील, ते सुरू आहेत का मला माहित नाही, परंतु सरकार स्थिर आहेत ते पडणार नाही असंही शरद पवार म्हणाले. परमबीर सिंह यांनी केलेले आरोप हे मुद्दाम केलेले आहेत असं वाटतं यापूर्वी का आरोप केले नाहीत, बदली झाल्यानंतर आरोप केले असं शरद पवारांनी सांगितलं.

अनिल देशमुख यांच्या बाबत सर्वांशी बोलून उद्यापर्यंत निर्णय घेतला जाईल देशमुख यांचे म्हणणे आहे ते देखील आम्हाला ऐकून घ्यावे लागणार आहे, असे त्यांनी सांगितले.

"सचिन वाझे यांना पोलीस दलात घेण्याचा निर्णय मुंबई पोलीस आयुक्तपदावरुन बदली करण्यात आलेल्या पोलीस अधिकारी परमबीर सिंग यांचाच होता. गृहमंत्र्यांनी दर महिन्याला १०० कोटी जमा करण्याचे टार्गेट दिल्याचा आरोप या पत्रात आहे. त्यांनी हे पत्र मुख्यमंत्र्यांना आणि मला पाठवलं आहे. यात पैसे गोळा कसे केले जातात आणि ते कुणाकडे दिले जाते यात नमूद करण्यात आलेलं नाही. देवेंद्र फडणवीस दिल्लीत गेल्यावर ते पत्र समोर आलं.

हे संपूर्ण प्रकरण गंभीर आणि संवेदनशील बनत आहे. त्यामुळे याची एखाद्या चांगल्या अधिकाऱ्यांकडून चौकशी व्हावी. मुख्यमंत्र्यांनी याची चौकशी करावी. राज्यातील सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न होतोय, मात्र महाविकासआघाडी सरकार स्थिर आहे. याचा कोणताही परिणाम सरकारवर होणार नाही," असंही पवारांनी स्पष्ट केलं.

गृहमंत्री पोलिस उपनिरीक्षकाची नेमणूक करत नाही असं शरद पवार सचिन वाझे यांच्याबाबत उपस्थित केलेल्या एका प्रश्नावर उत्तर देताना सांगितलं.

Updated : 21 March 2021 3:19 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top