राष्ट्रवादीत राजीनामा सत्र, जितेंद्र आव्हाड यांनी दिला राष्ट्रीय सरचिटणीस पदाचा राजीनामा
Jitendra awhad resign : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपण राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी राहणार नसल्याची घोषणा केली. त्यानंतर राष्ट्रवादीत पदाधिकाऱ्यांनी शरद पवार यांच्या निर्णयाचा विरोध करत राजीनामे देण्यास सुरुवात केली आहे.
X
Jitendra awhad resign : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपण राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी राहणार नसल्याची घोषणा केली. त्यानंतर राष्ट्रवादीत पदाधिकाऱ्यांनी शरद पवार यांच्या निर्णयाचा विरोध करत राजीनामे देण्यास सुरुवात केली आहे.
sharad pawar : शरद पवार यांच्या लोक माझा सांगाती या आत्मचरित्राच्या सुधारित आवृत्तीचे प्रकाशन मंगळवारी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात झाले. यावेळी शरद पवार यांनी आपण पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय घेत असल्याचे जाहीर केले. त्याचे सभागृहात तीव्र पडसाद उमटले. यावेळी कार्यकर्त्यांनी आंदोलन आणि उपोषणाचा इशारा दिला. याबरोबरच अनेक नेत्यांना अश्रू आणावर झाले. यानंतर येत्या दोन तीन दिवसात मी विचार करून निर्णय असे आश्वासन शरद पवार यांनी अजित पवार (ajit pawar) यांच्यामार्फत कार्यकर्त्यांना दिले. मात्र शरद पवार यांच्या निर्णयाचा विरोध करत जितेंद्र आव्हाड (Jitendra awhad resign) यांनी आपल्या राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय सरचिटणीस पदाचा राजीनामा दिला.
जितेंद्र आव्हाड ट्विट (Jitendra awhad tweet) करून म्हणाले आहेत की, साहेब नेहमी म्हणतात की,"लोकशाही मध्ये जनतेचा कौल नेहमी मान्य करायचा असतो. मग तो आपल्या स्वत:च्या मर्जीविरुद्ध का असेना. हीच खरी लोकशाही (Democracy) आहे..!" अस असताना आता खुद्द पवार यांनीच त्यांच्या या विचारांशी फारकत घेत काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP president) अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. लोकशाहीत विश्वास ठेवणारे शरद पवार असा निर्णय घेवूच कसा शकतात? हा निर्णय घेताना त्यांनी आम्हाला विश्वासात का नाही घेतलं..? राज्यात आणि देशात सध्या जे वातावरण आहे त्यात आम्ही शरद पवार यांच्याशिवाय कसे लढू शकतो? आम्हाला त्यांची गरज आहे आणि म्हणूनच मी जितेंद्र आव्हाड, शरद पवार यांनी घेतलेल्या धक्कादायक निर्णयाच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माझ्या राष्ट्रीय सरचिटणीस पदाचा राजीनामा देत आहे. माझ्यासहित ठाण्यातील माझ्या सर्व पदाधिकाऱ्यांनी देखील आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत, असंही जितेंद्र आव्हाड यांनी म्हंटले आहे.
आदरणीय @PawarSpeaks साहेब नेहमी म्हणतात की,"लोकशाही मध्ये जनतेचा कौल नेहमी मान्य करायचा असतो.मग तो आपल्या स्वत:च्या मर्जीविरुद्ध का असेना.हीच खरी लोकशाही आहे..!"
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) May 3, 2023
अस असताना आता खुद्द पवार साहेबांनीच त्यांच्या या विचारांशी फारकत घेत काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाचा… pic.twitter.com/QFqqaOs2Ov