राणा दांपत्याची आजची रात्र तुरूंगातच
आजची रात्र कारागृहातच काढावी लागणार
X
गेल्या दोन दिवसापासून राज्यात हायव्होल्टेज ड्रामा सुरू आहे. त्यातच राणा दांपत्याने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन हनुमान चालीसा पठन करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर शिवसैनिकांनी मातोश्रीबाहेर गर्दी केली होती. तर या प्रकरणामुळे राज्याचे राजकारण तापले होते. त्यामुळे राणा दांपत्याने आपल्या भुमिकेवरून माघार घेतली. त्यानंतर खासदार नवणीत राणा आणि रवी राणा यांना अटक करण्यात आली.
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या निवासस्थानाबाहेर जाऊन हनुमान चालीसा पठन करण्याचा इशारा दिल्यानंतर राणा दांपत्य मुंबईत दाखल झाले होते. त्यामुळे राज्यात वातावरण तापले होते. त्यातच राणे दांपत्याने मातोश्रीबाहेर जाणारच असा इशारा दिला होता. मात्र कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाल्यामुळे अखेर राणा दांपत्याने आपल्या भुमिकेवरून माघार घेतली. मात्र त्यानंतर राणा दांपत्याला अटक करण्यात आली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या खाजगी निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसा वाचण्याचं आव्हान देणाऱ्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना त्यांच्या मुंबईतील घरातून पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याविरोधात चिथावणीखोर विधान केल्याप्रकरणी शिवसेनेने गुन्हा दाखल केला आहे. तसेच त्यानंतर खार पोलिसांना राणा दाम्पत्याला कडेकोट पोलिस बंदोबस्तात खार पोलिस स्टेशनमध्ये आणलं आहे. राणा यांना उद्या न्यायालयात हजर केलं जाणार आहे. त्यांच्या विरोधात पोलिसांनी कलम १५३ (अ) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
राणा दांपत्याला शनिवारी अटक केल्यानंतर रविवारी न्यायालयात हजर करण्यात येईल. मात्र शनिवारची रात्र राणा दांपत्याला तुरूंगातच काढावी लागणार आहे.