नवी मुंबई विमानतळ नामकरण वाद: शिवसेना कोंडीत अडकली आहे का?
X
राज ठाकरे असो की उद्धव ठाकरे दोघांचेही राजकीय गुरु शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे. नवी मुंबई विमानतळाला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्याचा ठराव पास झाला आहे. या ठरावाला स्थानिकांनी विरोध केला आहे.
विशेष बाब म्हणजे राज ठाकरे यांनी नवी मुंबई विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव द्यायला पाहिजे. असं मत व्यक्त केलं आहे. तरीही मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनी नवी मुंबई विमानतळाला दी.बा.पाटील याचंचं नाव द्यायला हवं अशी मागणी करत रस्त्यावर उतरले आहेत.
तर दुसरीकडे शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नावाला विरोध करत शिवसैनिक उद्धव ठाकरे यांचा आदेश डावलून मोर्चात सहभागी झाले. या निमित्ताने काही प्रश्न उपस्थित होतात.
सिडको मध्ये भाजप असतानाही दी.बा.पाटील यांच्या नावाचा प्रस्ताव का आला नाही? कॉग्रेस आणि राष्ट्रवादीचे स्थानिक नेते का फुटले? काय आहे नेमकं राजकारण?. विमानतळाला दी.बा.पाटील यांचंच नाव का दयायचं?. भूमिपुत्रांच्या अस्मितेला कोण पादळी तुडवतंय या विषयी सविस्तर चर्चा पाहा मॅक्स महाराष्ट्राच्या टू द पॉईंट या कार्यक्रमात