पवारांच्या राष्ट्रवादीला तुतारी मिळताच नातु युगेंद्र पवारांची FB वर पोस्ट व्हायरल
X
शरद पवार यांचे नातू आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुतणे युगेंद्र पवार यांनी अजित पवारांची साथ सोडून शरद पवारांसोबत सोबत राहण्याचा निश्चय केला आहे. 1999 मध्ये शरद पवारांनी राष्टवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली पण 2023 मध्ये अजित पवारांनी एक मोठा गट वेगळा करत पक्षात फूट पाडली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे नाव आणि घड्याळ हे चिन्ह अजित पवारांना मिळालं. हा सगळा खटाटोप झाल्यानंतर युगेंद्र पवार यांनी शरद पवारांची साथ देण्याचा निर्णय घेतला आहे.
शरद पवार गटाला तुतारी हे पक्षचिन्ह मिळाल्यानंतर युगेंद्र पवारांनी आपल्या फेसबुकवरून पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टला त्यांनी कॅप्शन दिलं आहे की, 'दिल्लीपुढे न झुकण्याचा शिवरायांनी शिकविलेला स्वाभीमानी बाणा जपण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. जय जिजाऊ, जय शिवराय.' युगेंद्र यांची ही पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे.