मंत्री पदाची शपथ घेतलेले डॉ. भागवत कराड कोण आहेत?
X
आज झालेल्या मंत्रीमंडळ विस्तारात डॉ. भागवत कराड यांना संधी देण्यात आली आहे. मोदी सरकारच्या मंत्रीमंडळाचा विस्तार होत आहे. आज झालेल्या मंत्रीमंडळ विस्तारात खासदार नारायण राणे यांच्यासह महाराष्ट्रातून कपील पाटील, डॉ. भागवत कराड यांनी मंत्री पदाची शपथ घेतली. देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली.
वंजारी समाजातून आलेले डॉ. भागवत कराड हे राज्यसभेचे खासदार आहेत. डॉ. भागवत कराड हे औरंगाबाद चे महापौर देखील राहिलेले आहेत. दिवंगत भाजप नेते गोपिनाथ मुंडे यांनी त्यांना राजकारणात आणले. पेशाने डॉक्टर असलेले भागवत कराड आणि मुंडे परिवाराचे संबंध चांगले राहिलेले आहेत. मात्र, या मंत्रीमंडळ विस्तारात प्रितम मुंडे यांचं नाव आघाडीवर असताना भगवान कराड यांना दिलेली संधी पंकजा मुंडे यांना देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला शह मानला जात आहे.
महाराष्ट्रातून मोदी सरकारच्या नवीन मंत्रीमंडळात नारायण राणे, कपिल पाटील, डॉ भारती पवार, डॉ भागवत कराड यांना स्थान देण्यात आले आहे.