देवेंद्र फडणवीसांच्या टिकेला नाना पटोले यांचे उत्तर
X
सध्या मुंबई येथे विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात आज राज्यातील कोरोनाच्या परिस्थितीवरून विधानसभेत विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर सडकून टीका केली.
यावर मॅक्समहाराष्ट्रने नाना पटोले यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता ते म्हणाले-
"खोटं बोला पण रेटून बोला" असा देवेंद्र फडणवीस यांचा स्वभाव आहे. फडणवीसांच्या पाच वर्षाच्या कारकिर्दीत काय झालं? कशाप्रकारे आपल्या राज्य देशोधडीला लागलं यावर ते काहीच बोलले नाहीत आणि राहिला प्रश्न कोरोना चा तर कोरोना हा विषाणू चायना मधून आलेला आहे. तो काही भारतामध्ये निर्माण झालेला नाही. मी आत्ताच उत्तर प्रदेश ला जाऊन आलो. तिथे कोणत्याही प्रकारची तपास यंत्रणा नाही. लोक अक्षरशः मरत आहेत. ज्या राज्यांमध्ये आरोग्याचा प्रश्नाकडे लक्ष दिले जात नाही.
महाराष्ट्राचे सरकार राज्याच्या जीविताचा प्रश्न घेऊन त्यांचं संरक्षण करण्याचा प्रयत्न करत आहे तर यावर त्यांना आक्षेप घेण्याची गरज काय?
असा सवाल करत पटोले यांनी
विरोधकांचे काम हे फक्त विरोध करण्याचं असतं. असं त्यांना वाटतं... पण अशा परिस्थितीमध्ये विरोध न करता आपल्या राज्याच्या जनतेला आपण कशा पद्धतीने वाचवू शकतो. त्यावर उपाय योजना सांगण्याची गरज होती. पण असं काहीच न करता फक्त खोटे आरोप विरोधी पक्षांनी केले.
पूजा चव्हाण प्रकरणात काँग्रेस ची भूमिका काय?
काँग्रेसने नेहमीच नैतिकता जपलेली आहे. अगोदरही आरोप झालेले आहेत आणि आम्ही राजीनामे घेतलेले आहे. त्यामुळे राजीनामा प्रकरणी अजून पर्यंत कोणताही अहवाल आलेला नाही आणि अहवाल आल्याशिवाय आम्ही काही वक्तव्य करू शकत नाही.
खासदार मोहन डेलेकर आत्महत्येचे चौकशी करा
आज नाना पटोले यांनी दिवंगत खासदार मोहन डेलेकर यांच्या आत्महत्या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली. खासदार मोहन डेलेकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे देखील त्यांना होणाऱ्या त्रासाबाबत तक्रार केली असल्याचं नाना पटोले यांनी केली आहे.