अजित पवारांसह सरकारचे शिष्टमंडळ राज्यपालांच्या भेटीला
X
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आपले अभिभाषण अर्धवट सोडल्याची घटना ताजी असताना आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली महाविकास आघाडी सरकारच्या शिष्टमंडळाने राज्यपालांची राजभवन इथे भेट घेतली. तसेच राज्यपालांना विधानसभा अध्यक्ष निवडीसंदर्भातील निवेदन सादर यावेळी सादर करण्यात केले. सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवड करण्याबाबत तारीख निश्चित करण्यासाठीचा प्रस्ताव २१ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री कार्यालयामार्फत राज्यपालांना सादर करण्यात आलेला होता. या प्रस्तावाला मान्यता द्यावी अशी विनंती महाविकास आघाडी सरकारच्या शिष्टमंडळाने राज्यपालांना केली.
राज्य विधानसभेचे अध्यक्षपद लवकर भरण्याचे निर्देश राज्यपालांनी दिले होते. त्यानुसार डिसेंबर महिन्यात झालेल्या अधिवेशनाच्या कालवधीमध्ये विधानसभा अध्यक्ष निवडीसाठी तारीख निश्चित करण्यात आली नव्हती. त्यामुळे आता राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना सरकारच्या प्रस्तावाला मान्यता द्यावी अशी विनंती या शिष्टमंडळाने राज्यपालांना केली.