Home > Max Political > MPSC उत्तीर्ण होऊनही नोकरी नाही, विद्यार्थ्यांची आत्महत्या, आम्हालाही आत्महत्येची परवानगी द्या 413 विद्यार्थ्यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र...

MPSC उत्तीर्ण होऊनही नोकरी नाही, विद्यार्थ्यांची आत्महत्या, आम्हालाही आत्महत्येची परवानगी द्या 413 विद्यार्थ्यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र...

MPSC उत्तीर्ण होऊनही नोकरी नाही, विद्यार्थ्यांची आत्महत्या, 413 विद्यार्थ्यांनी नियुक्त्या न मिळाल्यानं मागितली मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्येची परवानगी...

MPSC उत्तीर्ण होऊनही नोकरी नाही, विद्यार्थ्यांची आत्महत्या, आम्हालाही आत्महत्येची परवानगी द्या 413 विद्यार्थ्यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र...
X

महाराष्ट्रातील स्वप्निल लोणकर Swapnil Lonkar या 24 वर्षीय (राहणार पुणे फुरसंगी) तरुणाने आत्महत्या केली आहे. त्याने आत्महत्ये अगोदर एक सुसाइड नोट लिहीली आहे, त्यात महाराष्ट्राच्या लोकसेवा आयोगाचं विदारक चित्र स्पष्ट होत आहे.

गेल्या दीड वर्षापासून स्वप्निल लोणकर हा तरुण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परिक्षा (MPSC Exam) उत्तीर्ण होऊनही न मिळाल्याने तणावाखाली होता. स्वप्निल ने MPSC ची पूर्व आणि मुख्य परीक्षा पास केली होती. दीड ते दोन वर्ष झाली तरी निर्णय होत नाही. वय वाढत चालले आहे.

जर करोना नसता तर कदाचित नियुक्ती झाली असती असे त्याने सुसाइड नोट मध्ये लिहिले आहे. स्वप्नीलचे वडील सुनील लोणकर यांचा शनिवार पेठेत बिल बुक बनविण्याचा छोटा प्रिटींग प्रेसचा व्यवसाय आहे. अशा परिस्थितीत आपल्या वडिलांना आपण अधिकारी झाल्यानंतर सुखाची भाकर मिळेल असा विचार करणाऱ्या स्वप्निलला एवढे कष्ट करुनही नोकरी मिळाली नाही.

अशीच परिस्थिती महाराष्ट्रातील 413 विद्यार्थ्यांची झाली आहे. MPSC परीक्षा पास होऊनही त्यांना अद्यापर्यंत नियुक्त्या मिळालेल्या नाहीत. या विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्या करण्याची परवानगी मागितली आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा अंतिम निकाल लागून एक वर्ष पूर्ण झालं तरी या भावी अधिकाऱ्यांना अद्यापर्यंत नियुक्ती देण्यात आलेली नाही. 1 वर्षापासून या भावी अधिकाऱ्यांच्या पोस्टींग थांबल्याने या सर्व विद्यार्थ्यांच्या आयुष्याचं चाक थांबलं आहे. कोणी शेतात काम करत आहेत. तर कोणी लोकांच्या घरी शेतात काम करत आहे. कोणी फळ विकण्याचा धंदा करत आहे. उच्च शिक्षित असून लॉकडाऊनच्या काळात या विद्यार्थ्यांना मिळेल ते काम करावी लागत आहेत.

अनेकांची लग्न थांबलं आहेत. मुलांचं एक वेळेस ठीक आहे. मात्र, मुलींना पोस्टींग न मिळाल्यानं मुलींसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. सरकारी अधिकारी झाल्या असतानाही घरचे आता त्यांच्यावर लग्नासाठी आग्रह धरत आहेत.

मराठा आरक्षणाच्या आड सरकार सरकारने या नियुक्त्या दिलेल्या नाहीत. पण आज मराठा आरक्षणाचा निकाल लागून (5 मे 2021) दोन महिने झाले तरी अद्यापपर्यंत या भावी अधिकाऱ्यांना नियुक्त्या देण्यात आलेल्या नाहीत. यातील अनेक विद्यार्थी ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातील आहेत. त्यांनी पुण्यासारख्या ठिकाणी पाच ते सहा वर्षे अभ्यास करून अत्यंत हलाखीत दिवस काढले आहेत.

एक पोस्ट मिळवण्यासाठी 5 ते 6 वर्ष अभ्यास करणारे हे विद्यार्थ्यांना एक पोस्ट मिळवण्यासाठी परीक्षा जाहीर झाल्यापासून साधारण 1 ते 1.5 वर्ष लागते. मात्र, या विद्यार्थ्यांचा जाहिरात सुटल्यापासून कालावधीचा विचार केला तर अडीच वर्ष पूर्ण झाले आहेत.

या परिक्षेची जाहिरात डिसेंबर 2018 मध्ये सुटली होती. पूर्व परीक्षा फेब्रुवारी 2019 मध्ये तर मुख्य परीक्षा फेब्रुवारी जुलै 2019 मध्ये या परिक्षेच्या मुलाखती फेब्रुवारी 2020 मध्ये तर अंतिम निकाल 19 जून 2020 ला लागला होता. त्यामुळं येत्या 19 जूनला परीक्षेचा निकाल लागला तरी या भावी अधिकाऱ्यांना नियुक्त्या न दिल्यानं या विद्यार्थ्यांनी आत्महत्याचा इशारा सरकारला दिला आहे.

स्वप्नील प्रमाणे हे विद्यार्थी देखील निराशेच्या गर्तेत अडकले आहे. त्यामुळं सरकारने याबाबत त्वरीत निर्णय घेणं गरजेचं असल्याचं मत व्यक्त केलं जात आहे.

Updated : 4 July 2021 12:38 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top