एकीकरण समितीच्या पराभवावर पेढे वाटणं हे दुर्दैवं – संजय राऊत
X
सोमवारी बेळगाव महामगरपालिका निवडणुकीचे निकाल लागले. या निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळाल्याने महाराष्ट्रात पेढे वाटत विजय साजरा केला. यामुळे शिवसेना खासदार संजय राउत यांनी भाजपवर टीका केली आहे.
माध्यमांशी बोलताना, "शिवाजी महाराजांना आग्र्यात औरंगजेबाने कैद केले तेव्हा महाराष्ट्रावर शोककळा पसरली होती तरी महाराष्ट्रातील काही लोकांनी आनंद व्यक्त केला होता तसा महाराष्ट्र एकीकरण समितीचा बेळगाव महानगर पालिकत पराभव झाला याचे राज्यातील सर्वच राजकीय पक्षांना दुःख आहे. एकीकरण समितीचा पराभव झाला म्हणून भाजप ने पेढे वाटले हे १०५ हुतात्म्यांच दुर्दैव आहे.", असे संजय राऊत म्हणाले.
याशिवाय, "विरोधकांकडून एकीकरण समितीत फाटाफूट केली गेली. महापालिकेकडून वॉर्ड पुनर्वरचना केली गेली. प्रचाराला वेळ मिळू दिला नाही. तरीही समितीने संघर्ष केला. कार्यकर्ते जेल मधे गेले याचे कौतुक केले पाहिजे. सत्ताधारी फाटाफूट घडवूनच निवडून आले. सत्तेचा दुरुपयोग केला गेला." असं देखील संजय राऊत म्हणाले.
या निवडुकीत भाजपला सर्वाधिक ३६ जागा मिळाल्या तर महाराष्ट्र एकीकरण समितीचा सपशेल पराभव झाला. समितीचे या निवडणुकीत फक्त २ नगरसेवक निवडून आले आहेत.