कोरोना नियम पायदळी तुडवत; कव्वालीच्या कार्यक्रमात खासदार जलील यांच्यावर नोटांची उधळण
X
लॉकडाऊन असतानाही एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी सर्व नियम पायी तुडवत कव्वालीच्या कार्यक्रमात हजेरी लावल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एवढच नाही तर,त्यांच्यावर नोटांची मोठ्या प्रमाणात उधळण केली जात असल्याचा सुद्धा व्हिडीओ पहायला मिळत आहे.
खुलताबाद परिसरात कव्वालीच्या एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. कव्वालीच्या या कार्यक्रमात खासदार इम्तियाज जलीलही सहभागी झाले. त्याच्यासोबत त्यांचा मुलगाही कार्यक्रमात हजर होता. कार्यक्रम सुरू असताना जलील जेव्हा व्यासपीठावर गेले तेव्हा त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात नोटांची उधळणही करण्यात येत असल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.
तसेच कार्यक्रमात कुणीच मास्क घातल्याच दिसत नाही, तसेच सोशल डिस्टनस सुद्धा पाळले गेले नसल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधीच अश्या पद्धतीने वागायला लागले, तर सर्वसामान्यांनी काय बोध घ्यायचा असा प्रश्न उपस्थित होत आहे.
गुन्हा दाखल होणार का ?
या कवाल्लीच्या कार्यक्रमात सरकारने सांगितलेले सर्व नियम पायी तुडवण्यात आले. त्यामुळे आयोजक आणि जलील यांच्यावर कारवाई होणार हे पाहणे महत्वाचं ठरणार आहे.