मोदींनी अटल टीमला डावललं, अटल टीमचे फक्त 4 चं मंत्री मंत्रीमंडळात
X
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi Cabinet Expansion) यांनी बुधवारी आपला मंत्रिमंडळ विस्तार जाहीर केला. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात झालेला हा पहिला कॅबिनेट विस्तार होता. या मंत्रिमंडळात युवा चेहऱ्यांना संधी दिली गेली आहे. भविष्याच्या दृष्टीकोनातून मोदी यांनी हा मंत्रिमंडळ विस्तार केल्याचं बोललं जात आहे.
जरा इतिहासाचे पानं पाहिली तर दिवंगत अटल बिहारी वाजपेयी सरकारच्या मंत्रिमंडळात जे सदस्य सहभागी होते. त्यांच्यातले काहीच चेहरे मोदी सरकारचा आज हिस्सा आहे. यातलं सगळ्यात मोठं नाव आहे ते म्हणजे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचं आहे.
उत्तर प्रदेश चे मुख्यमंत्री राहिलेले राजनाथ सिंह हे अटल सरकारमध्ये कृषी मंत्री होते. अटल यांच्या कॅबिनेट मध्ये राजनाथ सिंह एक वर्ष कृषी मंत्री होते. अटल बिहारी वाजपेयी यांच्यानंतर भाजपचं नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्रात सरकार आलं. त्यात पहिल्या कार्यकाळामध्ये राजनाथ सिंह देशाचे गृहमंत्री झाले आणि आता दुसऱ्या कार्यकाळात त्यांच्याकडे सुरक्षा मंत्रालय असे महत्त्वाचं खातं देण्यात आलं होतं.
कॅबिनेट मंत्र्यांमध्ये फक्त राजनाथ सिंह यांचं नाव आहे. जे टीम अटल पासून ते मोदी टीम मध्ये सहभागी आहेत. त्यांच्या व्यतिरिक्त मुख्तार अब्बास नकवी, श्रीपाद नाईक आणि प्रल्हाद सिंह पटेल असे मंत्री आहे
मुख्तार अब्बास नकवी 1998 च्या कार्यकाळात राज्यमंत्री झाले होते. जेव्हा श्रीपाद नाईक, प्रल्हाद सिंह पटेल अटल सरकारच्या अंतिम कार्यकाळातील सदस्य होते.
काही दिवसांपूर्वी रविशंकर प्रसाद, प्रकाश जावडेकर, संतोष गंगवार यांच्या राजीनाम्यासोबतच अटल-अडवाणी युगातील मोठ्या नेत्यांची कॅबिनेट मधून सुट्टी झाली. तर दुसरीकडे असेही काही मंत्री आहेत. जे अटल सरकार मध्ये मंत्रिमंडळात सहभागी होते आणि मोदी सरकारच्या पहिल्या आणि दुसऱ्या कार्यकाळातही त्यांना पद मिळालं आहे. परंतु आता ते या मंत्रिमंडळाचा हिस्सा नाही.
मेनका गांधी, उमा भारती, सुरेश प्रभु, राजीव प्रताप रुडी, विजय गोयल, अनंत गीते हे मंत्री अटल मंत्रिमंडळात आणि मोदी मंत्रिमंडळाचा राहिलेले आहे.
दरम्यान, दिवंगत केंद्रीय मंत्री अरूण जेटली, दिवंगत सुषमा स्वराज, दिवंगत रामविलास पासवान, अनंत कुमार हे अटल मंत्रिमंडळाचे सदस्य होते. त्यानंतर मोदी सरकारच्या कॅबिनेट मध्ये ही यांना जागा मिळाली. परंतु आता हे हयात नाही. त्यांच्या व्यतिरिक्त वैकंय्या नायडू दोन्ही मंत्रिमंडळात राहिले आहे. परंतु मोदी सरकारमध्ये त्यांना उपराष्ट्रपती बनवलं. सुमित्रा महाजन अटल सरकार मध्ये मंत्री राहिल्या होत्या. तर मोदी सरकार च्या कार्यकाळात त्यांनी लोकसभा अध्यक्षांचं पद सांभाळलं.
एकंदरीत माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळातील अनेक सदस्य राहिलेल्या मंत्र्यांना मोदी यांच्या कॅबिनेट मध्ये सहभागी केलेल दिसून येत नाही. लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, यशवंत सिन्हा, जसवंत सिंह, अरुण शौरी अशा मोठ्या नावांचा समावेश करण्यात आलेला नाही.
टीम मोदी मध्ये टीम अटलजींचे सदस्य
1. राजनाथ सिंह (सुरक्षा मंत्री)
2. मुख्तार अब्बास नकवी (अल्पसंख्याक मंत्री)
3. श्रीपद नायक (राज्य मंत्री)
4. प्रल्हाद सिंह पटेल (राज्य मंत्री)
मोदी आणि अटल टीमचे सदस्य राहिले परंतु आता मंत्रिमंडळात सहभागी नसलेले
1. सुषमा स्वराज
2. अनंत कुमार
3. सुरेश प्रभू
4. मेनका गांधी
5. उमा भारती
6. संतोष गंगवार
7. अरुण जेटली
8. रविशंकर प्रसाद
9. राजीव प्रताप रुडी
10. वैंकया नायडू (उपराष्ट्रपती)
11. बंडारू दत्तात्रेय (राज्यपाल)
12. रामविलास पासवान
13. अनंत गीते
14. विजय गोयल
15. सुमित्रा महाजन