Home > Max Political > नवी मुंबई विमानतळ : दि.बा. पाटील यांचे नाव देण्याची मनसे आमदाराची मागणी

नवी मुंबई विमानतळ : दि.बा. पाटील यांचे नाव देण्याची मनसे आमदाराची मागणी

नवी मुंबई विमानतळ : दि.बा. पाटील यांचे नाव देण्याची मनसे आमदाराची मागणी
X

नवी मुंबईत होणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे नेते दि.बा. पाटील यांचे नाव देण्याची मनसेची भूमिका कायम आहे, अशी भूमिका मनसेचे आमदार राजू पाटील यांनी मांडली आहे. विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी नवी मुंबईत सिडकोला घेराव घालण्याचे आंदोलन सुरू आहे, या आंदोलनात आमदार राजू पाटील आणि मनसे शेकडो कार्यकर्ते रवाना झाले आहेत.

आजच्या आंदोलनात आपण सहभागी होणार नाही असं कोणीही बोललं नव्हतं. राज ठाकरे यांनी केवळ तांत्रिक बाब उपस्थित केला होता. या विमानतळाचे कोणतेही नाव अद्याप अंतिम झाले नसेल तर दि.बा.पाटील यांचेच नाव देण्याची आमची भूमिका आजही कायम असल्याचे आमदार राजू पाटील म्हणाले. तर याप्रकरणी भाजपने आधीच भूमिका स्पष्ट केली पाहीजे होती. मात्र आम्ही यापुढेही भूमीपुत्रांचा आवाज उठवत राहणार आणि आताही त्याचसाठी जात असल्याचे आमदार राजू पाटील म्हणाले.

Updated : 24 Jun 2021 12:38 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top