अशी टीका बाळासाहेबांनाही आवडली नसती, शिंदे ठाकरे वादात मनसेची उडी
X
दसऱ्याला झालेल्या शिवसेनेच्या मेळाव्यांमधील भाषणांवर अनेक विरोधकांनी आपापल्या प्रतिक्रीया द्यायला सुरूवात केली आहे. त्यात आता मनसेने देखील उडी घेतली आहे. लहान बाळावर टीका करण हे बाळासाहेबांना देखील आवडलं नसतं असा टोला त्यांनी उध्दव ठाकरेंना लगावला आहे.
यंदाचा दसरा मेळावा शिवसेनेसाठी ऐतिहासिक ठरला. कधी नव्हे तो शिवसेनेचे दोन दसरा मेळावे झाले. त्यात दोन्ही गटांकडून एकमेकांवर तुफान टीका देखील करण्यात आली. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना त्यांच्या नातवाचा देखील उल्लेख केला. बाप मंत्री, कार्ट खासदार, नातू नगरसेवक पदासाठी डोळा लावून बसला आहे अशी टीका केली होती. त्यावर एकनाथ शिंदे यांनी देखील त्यांचा नातू हा केवळ दीड वर्षांचा असल्याचं म्हटलं होतं उध्दव ठाकरेंच्या पायाखालची वाळू सरकल्याने अशी टीका करत आहेच असं प्रत्युत्तर दिलं. होतं.
य़ा प्रकारानंतर श्रीकांत शिंदे यांनी देखील उध्दव ठाकरेंना पत्र लिहून दीड वर्षाच्य़ा मुलावरील टीका कुटूंबप्रमुखाला शोभत नाही असं म्हटलं आहे. एका दीड वर्षाच्या लहान बाळाला आपल्या भाषणात खेचणं हे तुमच्या धगधगत्या हिंदूत्वात बसतं का? असा सवाल श्रीकांत शिंदे यांनी उध्दव ठाकरेंना विचारला होता.
या दोन्ही मेळाव्यांवर विरोधकांच्या प्रतिक्रीया देखील आल्या. मनसेने देखील या वादात आता उडी घेतली आहे. मनसेचे माजी नगरसेवक संदिप देशपांडे यांनी उध्दव ठाकरेंवर टीका केली आहे. "खोके, गद्दार, खंजीर,सगळं समजू शकतो पण त्या दीड वर्षाच्या "बाळाचा" केलेला उल्लेख माननीय बाळासाहेबांना पण आवडला नसता." अशी टीका त्यांनी केली आहे.
खोके, गद्दार, खंजीर,सगळं समजू शकतो पण त्या दीड वर्षाच्या "बाळाचा" केलेला उल्लेख माननीय बाळासाहेबांना पण आवडला नसता.
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) October 7, 2022